घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी साधला विधानसभा अध्यक्षांवर निशाणा, म्हणाले...

Uddhav Thackeray : कोकण दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी साधला विधानसभा अध्यक्षांवर निशाणा, म्हणाले…

Subscribe

पेण : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात ज्यांनी आपल्या सगळ्या डाव्या परिशिष्टाची चिरफाड करून जो विक्षिप्त निर्णय दिला, त्यांनी मोठी संधी गमावली, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. कोकण दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांची दोन कोकणात आज (ता. 01 फेब्रुवारी) दोन ठिकाणी सभा पार पडली. या दोन्ही सभेत ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. तर चौल येथे झालेल्या सभेतून उद्धव ठाकरेंनी आगामी लोकसभा निवडणुकीची एक प्रकारे रणशिंग फुंकले आहे. (Uddhav Thackeray targeted the Assembly Speaker during his Konkan tour)

हेही वाचा… Uddhav Thackeray : कोकणात उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का, माजी आमदार करणार भाजपमध्ये प्रवेश

- Advertisement -

चौल येथील सभेत उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात ज्यांनी आपल्या सगळ्या डाव्या परिशिष्टाची चिरफाड करून जो विक्षिप्त निर्णय दिला, ते कोण हे तुम्हाला माहीत आहे, कारण तुम्ही त्यांचे गावकरी आहात. त्यामुळे तुम्ही जास्त त्यांना ओळखता. आम्हाला ते हल्ली दिसायला लागले आहेत. पण पूर्वी ते आपल्यामध्ये होते. त्यांनी निर्णय देताना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी होती, ती म्हणजे नशिबाने त्यांना एक संधी दिली होती. असे नशीब कोणाचेही नसते. म्हणजे, अध्यक्षांची एक परंपरा आहे. लोकसभा, विधानसभा अध्यक्षांची एक परंपरा आहे. त्या परंपरेला साजेसे काम त्यांनी करायला हवे होते. पण लाचारीमुळे, दलालीमुळे समोर येणार कागद वाचावा लागतो. लोकशाहीचा कायद्याचा मुडदा पाडताना सर्व जग तुमच्याकडे पाहत आहे, अशी अप्रत्यक्षपणे टीका करत उद्धव ठाकरेंनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना सुनावले आहे.

या सभेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही निशाणा साधला. तुम्ही येत्या निवडणुकीत 400 पार होणार आहात तर मग तुम्हाला नितीश कुमार कशाला हवे आहेत? झारखंड मुक्ती मोर्चातील वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना तुरुंगात का टाकत आहात? आधी 400 पार व्हा, मग सोरेन यांना तुरुंगात टाका. 400 पार होणार आहात तर मग घाईघाईने राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा का केलीत? तुम्हाला राम मंदिर हवे आहे आणि नितीश कुमारही हवे आहेत. तुमच्याकडे येतील त्यांच्यावरील खटले मागे घेतले जात आहेत. हे सगळं काय चालल आहे. ४०० पारबाबत दावा करता आणि नितीश कुमारांना आपल्याबरोबर घेता, ही कसली भीती आहे?, असा प्रश्नही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -