घरमहाराष्ट्र'...यालाच शिवसैनिक म्हणतात'; सेना भवनाजवळील राड्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

‘…यालाच शिवसैनिक म्हणतात’; सेना भवनाजवळील राड्यावरुन उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधताना सेनाभवनासमोरील झालेल्या राड्यावर अप्रत्यक्षरित्या भाष्य केलं. “शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक भाषण व्हायरल होत आहे. त्यात ते त्याचा फटकन आवाज आला तर आपला काडकन आवाज आला पाहिजे असं सांगत आहेत. हे का व्हायरल होतंय हे ज्याचं त्याला माहिती आहे. यालाच शिवसैनिक म्हणतात,” असं बोलत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला.

शिवसेना प्रमुखांचं जुनं भाषण व्हायरल होतंय. त्यातलं एक वाक्य “त्याचा फटकन आवाज आला, तर आपला काडकन आवाज आला पाहिजे.” हे भाषण दोन दिवसापासून सगळीकडे का व्हायरल होत आहे हे ज्याचं त्याला माहिती आहे. याला म्हणतात शिवसैनिक. ही शिवसैनिकाची ओळख आहे. असं असलं तरी फक्त हाणामाऱ्या करणं, खुनखराबा करणं हे आपलं काम नाही, असा सल्ला देखील उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिला. रक्तपात करणं हा शिवसैनिकाचा गुणधर्म नाही. अन्यायावर वार करणारा शिवसैनिक रक्तपात करणारा नाही. पण ही ओळख जर कुणी मुद्दाम करुन देत असेल, तर रक्तदान करणाऱ्या शिवसैनिकांची ओळख अनेकांना आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

१९९२-९३ मध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरला नसता तर मुंबई वाचली नसती. हे त्रिवार सत्य आहे, पण त्याचबरोबर रक्तदान करणारे शिवसैनिक ही देखील शिवसेनेची ओळख आहे. आरोप करणाऱ्या किती जणांची अशी ओळख आहे हे पहिल्यांदी त्यांनी मला सांगावं. बदनामी करणारे बदनामी करत आहेत. राजकारणाचं विदृपीकरण सुरू आहे. आरोप करायचं आणि पळून जायचं असं सुरू आहे. आरोप करणाऱ्यांनी स्वतःचे चेहरे आरशात पाहिले आहेत का? ते कोण आहेत, त्यांचं सर्व चारित्र्य स्वच्छ आहेत का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना केला.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -