घरमहाराष्ट्रआता सरसंघचालकांनी कार्यालयातील कोपरे तपासून पाहावेत, लिंबू अन् टाचण्या...; उद्धव ठाकरेंचा टोला

आता सरसंघचालकांनी कार्यालयातील कोपरे तपासून पाहावेत, लिंबू अन् टाचण्या…; उद्धव ठाकरेंचा टोला

Subscribe

Uddhav Thackeray | यांची बुभूक्षित नजर आहे. ही नजर फार वाईट आहे. एखादी गोष्ट आपण नाही मिळवू शकत तर त्यावर कब्जा कसा मिळवायचा ही यांची वृत्ती आहे. त्यामुळे आरएसएसने आता विचार करायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आरएसएस मजबूत आहे, त्यामुळे त्यावर ताबा घेऊ शकत नाही मात्र, आरएसएसने आता सावध राहायला पाहिजे, असंही ते म्हणाले. 

नागपूर – एकनाथ शिंदे गटाने मुंबई महानगरपालिकेतील शिवसेना कार्यालयावर काल ताबा मिळवला. याप्रकरणावरून प्रचंड गदारोळ झाला आहे. यावरून शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर सडेतोड टिका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आरएसएस कार्यालयात गेले होते. त्यामुळे कार्यालयातील कोपरे तपासून पाहा. टाचण्या अन् लिंबू वगैरे ठेवले आहेत का, असा सल्ला ठाकरेंनी मोहन भागवत यांना दिला आहे. आज नागपुरात उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

हेही वाचा – आधार देतायत की गाढतायत यावर विचार करा, शिंदे गटातील मंत्र्यांना उद्धव ठाकरेंचा सल्ला

- Advertisement -

‘मिंधे गट आज तर आरएसएस कार्यालयात गेले होते. तिथेही ताबा मिळवायला गेले होते का याचं उत्तर मिळालेलं नाही. ज्यांच्यात कतृत्त्व नसतं, स्वतः काही निर्माण करण्याची कुवत नसते, ते सरळसरळ उघडउघड ताब्यात घेतात. काही लोकांच्या मनात न्युनगंड असतो. आपण काहीही करू शकत नाही, आपल्या सुमारी कवुतीची त्यांना जाणीव असते. त्याचं रुपांतर अहंगंडात करतात. दुसऱ्यांचे नेते चोरायचे. दुसऱ्यांचे पक्ष चोरायचं, अशी कामं केली जातात.त्यामुळे मला मोहन भागवंतांना सांगायचं आहे की कोपरे न् कोपरे तपासा कुठे टाचण्या अन् लिंबू वगैरे पडले आहे का, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा एवढं स्वागत केल्यावरही विदर्भाला काय दिलं? उद्धव ठाकरेंचा सवाल

- Advertisement -

यांची बुभूक्षित नजर आहे. ही नजर फार वाईट आहे. एखादी गोष्ट आपण नाही मिळवू शकत तर त्यावर कब्जा कसा मिळवायचा ही यांची वृत्ती आहे. त्यामुळे आरएसएसने आता विचार करायला हवा, असं उद्धव ठाकरे म्हणाले. आरएसएस मजबूत आहे, त्यामुळे त्यावर ताबा घेऊ शकत नाही मात्र, आरएसएसने आता सावध राहायला पाहिजे, असंही ते म्हणाले.

भाजपाच्या पोटातलं ओठात आलं

काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की निवडणुका आल्या की उद्धव ठाकरे मुंबईचा प्रश्न उपस्थित करतात. पण भाजपच्याच नेत्याने आता मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच भाजपाच्या पोटातलं आता ओठात आलं आहे. मुंबईवर सत्ता मिळवून यांना नेमकं काय करायचं आहे हे या भाजपाच्या नेत्याच्या तोंडून निघालं आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -