Homeमहाराष्ट्रUddhav Thackeray : रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू; उद्धव ठाकरेंचा एकनाथ...

Uddhav Thackeray : रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला

Subscribe

उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे वारंवार त्यांच्या दरे या गावी जात असल्यामुळे यावरही भाष्य करत "रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू" असा टोला लगावला. ठाकरेंनी शिंदेंचे नाव न घेता, त्यांच्यावर हल्ला चढवला.

मुंबई : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या आज (गुरुवार, 23 जानेवारी) जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाचे मेळावे मुंबईत पार पडले. यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांचा मेळावा अंधेरीतील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे पार पडला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपा राष्ट्रीय नेते अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. याचवेळी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला. यावेळी ठाकरेंनी एकनाथ शिंदे वारंवार त्यांच्या दरे या गावी जात असल्यामुळे यावरही भाष्य करत “रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू” असा टोला लगावला. मनासारखे काही झाले नाही की हे गावी जाऊन बसतात, असे म्हणत ठाकरेंनी शिंदेंचे नाव न घेता, त्यांच्यावर हल्ला चढवला. (Uddhav Thackeray taunted Eknath Shinde by saying Rusu Bai Rusu, Gavat Jaun Basu)

यावेळी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत गद्दार जिंकले असतील, कारण त्यांना जिंकवणारे अमित शहा तिकडे बसले असू त्यांनी या विजयासाठी बेकायदेशीररित्या यंत्रणा वापरल्या. निवडणूक आयोगाचाही वापर करण्यात आला. पण जोपर्यंत अमित शहा आहेत, तोपर्यंतच त्यांचे तिथे बसणे आहे, एकदा महापालिका निवडणुका झाल्या की, यांची काय विल्हेवाट लागते ते पाहा, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना खडेबोल सुनावले. ज्या पद्धतीने अडिच वर्ष यांना मुख्यमंत्री म्हणून वागणूक मिळत होती, पण आता बसायचे तर बसा नाही तर गावी निघून जा, अशी अवस्था झाली असल्याचा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदेंचे नाव न घेता त्यांना लगावला आहे.

हेही वाचा… Uddhav Thackeray : पाठीत वार केला तर वाघनखं काढू, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

लहान मुलांचे एक गाणं आहे की, रुसू बाई रुसू कोपऱ्यात बसू. तसे यांचे झाले आहे की, पाहिजे ते मंत्रिपद देत नाही, रुसले, गेले गावी. दावोसला नेले नाही, गेले गावी. खुर्ची बाजूला ठेवली नाही, गेले गावी. रुसू बाई रुसू, गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागले आहेत, असा टोला यावेळी उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या दरे गावी जाण्यावरून लगावला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आपण भ्रमात राहिलो, असेही यावेळी उद्धव ठाकरेंनी मान्य केले. याबाबत ते म्हणाले की, आपल्याला असे वाटले की, यांचे गाढव अडवल्याने आपण विधानसभा जिंकली असे आपल्याला वाटले, पण आपण गाफील राहिलो आणि त्याचा गैरफायदा त्यांनी घेतला. त्या काळात त्यांनी आपला अपप्रचार केला, असे म्हणत यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर खडेबोल सुनावले.