घरमहाराष्ट्रUddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावल्याने उद्धव ठाकरे संतापले;...

Uddhav Thackeray : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावल्याने उद्धव ठाकरे संतापले; सुनावले खडेबोल

Subscribe

राजापूर : आगामी लोकसभा, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कोकण दौऱ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. उद्धव ठाकरे यांचा जनसंवाद यात्रेचा झंझावात दौरा आज राजापूरमध्ये पोहोचला असून जवाहर चौकात त्यांची सभा पार पडली. यावेळी एका एसीबी अधिकाऱ्याबद्दल संताप व्यक्त करतानाच उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. (Uddhav Thackeray got angry at the price of Chhatrapati Shivaji Maharaj statue Harassment heard)

हेही वाचा – Paytm Stocks : आरबीआयच्या निर्बंधांनंतर पेटीएमचे शेअर्स 10 टक्क्यांनी कोसळले; गुंतवणुकदारांना मोठा फटका

- Advertisement -

शिवसेना उपनेते आमदार राजन साळवी यांच्या घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने काही दिवसांपूर्वी छापा टाकला होता. त्यावेळी त्यांच्या घरातील वस्तूंच्या त्यांनी किमती ठरवल्या होत्या. याचपार्श्वभूमीवर संताप व्यक्त करताना उद्धव ठाकरे यांनी एसीबीने आमदार राजन साळवी यांच्या घरातील संपत्तीची किंमत लावलेली यादी वाचून दाखवली. तसेच या यादीवर सुशांत चव्हाण नावाच्या व्यक्तीची सही आहे. चव्हाण मराठी असतील अशी आशा आहे. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत 5 हजार लावली आहे, बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो आणि खुर्ची यांची किंमत दहा हजार रुपये लावली आहे. पण तुमच्या सात पिढ्या आल्या तरी त्याची किंमत करता येणार नाही. जर तुमच्या आई वडिलांची किंमत केली तर चालेल का? तुमची किंमत किती? असे प्रश्न उपस्थित करत ‘मिंध्याना’ त्यांच्या वडिलांची किंमत कळाली नाही म्हणून माझा बाप चोरताहेत, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला.

तुमची लांडगेगिरी सरळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही

अधिकाऱ्यांना इशारा देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मी यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतो की, दिवस बदलत असतात. आज दुर्दैवाने त्यांचे दिवस आहेत, पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचेही दिवस फिरतील हे लक्षात ठेवा. त्यांचे दिवस फिरले तर तुमचे दिवस आणखी वाकडे होतील. सरकार येतं आणि जातं. राज्यात अनेक मुख्यमंत्री झाले. मीही मुख्यमंत्री झालो. कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही. लांडग्यासारखी तुम्ही कोणाची लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी सरळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.

- Advertisement -

हेही वाचा – Sonali Kulkarni: सोनाली कुलकर्णीने सांगितला मल्याळी चित्रपटातील अनुभव, म्हणाली ‘पहिल्याच सिनेमात…’

आमदारांना हातात पिस्तुल घ्यावं लागतंय

राजन साळवी यांची काय प्रॉपर्टी सापडली आहे? असा प्रश्न करत उद्धव ठाकरे यांनी मागणी केली की, जर त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापूरमध्ये जे इच्छुक उमेदवार म्हणून खर्च करत आहेत, त्यांच्या घरी आधी धाड टाका. त्यांच्या भावाच्या संपत्तीची चौकशी करा. गणपत गायकवाड यांनी आरोप केला मिंध्यांकडे त्यांचे करोडो रुपये आहेत. गणपत गायकवाड काय बोलले याची दखल का नाही घेत? सत्ताधारी आमदाराला काही किंमत नाही? आमदारांना हातात पिस्तुल घ्यावं लागत आहे. गणपत गायकवाडांना काय भोगावं लागलं हे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -