Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रUddhav Thackeray : शिंदे दरे गावी गेल्याने ठाकरेंची जहरी टीका; राक्षसी बहुमत...

Uddhav Thackeray : शिंदे दरे गावी गेल्याने ठाकरेंची जहरी टीका; राक्षसी बहुमत मिळाल्यानंतरही…

Subscribe

दिल्लीतील बैठक आटोपून सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (29 नोव्हेंबर) थेट साताऱ्यातील दरे या आपल्या गावी गेले आहेत. याचपर्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे

पुणे : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा झाला तरी महायुतीकडून सरकार स्थापन होताना दिसत नाहीय. दिल्लीत बैठकांवर बैठका होत आहे. मात्र दिल्लीतील बैठक आटोपून सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी (29 नोव्हेंबर) थेट साताऱ्यातील दरे या आपल्या गावी गेले आहेत. याचपर्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जहरी टीका केली आहे. (Uddhav Thackeray venomous criticism after Eknath Shinde went to Dare village)

पुण्यातील फुले वाड्यात आत्मक्लेश उपोषण करणाऱ्या बाबा आढाव यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आपले उपोषण सोडले. त्याआधी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. एवढं राक्षसी बहुमत असून देखील महाराष्ट्रात आनंद का नाही? बहुमत मिळून देखील राजभवनात जाण्याऐवजी हे लोक शेतात पूजाअर्चा करण्यासाठी का जात आहेत? असे प्रश्न उपस्थित करत अमावस्येला पूजा अर्चा करण्यासाठी गेले, यावरून त्यांची मानसिकता दिसून येते, अशी जहरी टीका उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केली.

- Advertisement -

हेही वाचा – Politics : …म्हणून बाबा आढावांच्या भेटीला जिंकलेले आणि हरलेले सुद्धा येतायत; ठाकरेंनी सांगितलं कारण

उद्धव ठाकरे म्हणाले की, जेव्हा आमची महाविकास आघाडी आली तेव्हा राष्ट्रपती राजवट लागली होती. पण आता विधानसभेची मुदत संपलेली असताना देखील राष्ट्रपती राजवट का लागली नाही? या सर्व प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नाही. एवढं बहुमत मिळाल्यावरसुद्धा लोक राजभवनात जाण्यऐवजी शेतात का जातात? अमावस्येचा मुहुर्त का घेतात? मुख्मयंत्री कोण होणार? मंत्रिमंडळात कोण येणार? याबाबत काहीच तयारी नाही. जागा वाटपाही वेळ लागतोय, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडली

दरम्यान, सत्ता स्थापनेच्या धावपळीत राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या साताऱ्यातील आपल्या दरे गावी आहेत. ते गावी गेल्याने अनेक चर्चांना उधाण आलं आहे. तसेच विरोधकही त्यांच्यावर टीका करताना दिसत आहेत. अशातच एकनाथ शिंदेंची तब्येत बिघडल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या दरे गावातील बंगल्यावर डॉक्टरांची टीम पोहचली आहे. एकनाथ शिंदेंना 105 एवढा ताप आला आहे. त्यामुळे त्यांना सलाईन लावल्याचे समजते. प्रकृतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे आज घराबाहेरही पडले नाहीत.

हेही वाचा – Baba Adhav : तीन दिवस आत्मक्लेश आंदोलन; ठाकरेंच्या उपस्थितीत बाबा आढावांनी सोडले उपोषण


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -