घरमहाराष्ट्रUddhav Thackeray Vs BJP : आज शिवाजी महाराज हयात असते तर...; आव्हाडांचा...

Uddhav Thackeray Vs BJP : आज शिवाजी महाराज हयात असते तर…; आव्हाडांचा भाजपावर निशाणा

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे सध्या रायगड दौऱ्यावर असून त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे. मोदी सरकारवर टीका करताना त्यांनी काल, गुरुवारी बिल्किस बानो प्रकरणाचा उल्लेख केला होता. त्यावरून भाजपा नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर, या वादात राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आमदार डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी उडी घेतली आहे.

हेही वाचा – Fadnavis On Thackeray : “उद्धव ठाकरे टीका नाही, तर गरळ ओकत आहेत”, देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर

- Advertisement -

या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनंतर लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने प्रत्येक राजकीय पक्षाने मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात झाली आहे. ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे सध्या रायगडात असून विविध ठिकाणी त्यांच्या प्रचारसभा होत आहेत. पेण येथे काल, गुरुवारी झालेल्या सभेत त्यांनी मोदी सरकारच्या महिलांविषयक भूमिकेवर कडाडून टीका केली. यंदाच्या अर्थसंकल्पातून मोदी सरकार महिलांच्या उन्नतीवर लक्ष देत आहेत. पण मग पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये का गेले नाहीत? बिल्किस बानोकडे जा, त्यांच्या अत्याचाऱ्यांना तुरुंगातून सोडले होते. त्यांना सांगा आम्ही तुझ्यासाठी काम करणार आहोत, असे थेट आव्हानच त्यांनी दिले होते.

- Advertisement -

त्याला मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार Adv. आशिष शेलार यांनी ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. अखेर उद्धव ठाकरे यांनी बिल्किस बानो यांचा वकालतनामा घेतलाच. रायगडच्या भूमीतून केलेल्या भाषणात बिल्किस बानोवर दया दाखवलीच…” असा टोला त्यांनी सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून लगावला आहे.

हेही वाचा – Bhujbal On Gaikwad : छगन भुजबळांचा संजय गायकवाडांना टोला; “ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही शिकलात…”

हाच संदर्भ घेत राज्याचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी, भाजपावर निशाणा साधला आहे. बिल्किस बानोची बाजू घेऊन बोलल्याबद्दल भाजपा नेते ज्या प्रकारे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत, ते बघता इतकी खालची पातळी महाराष्ट्राच्या राजकारणाने कधीच गाठली नव्हती, असे त्यांनी सुनावले आहे.

ज्यांना आपल्या महाराष्ट्रधर्माचा इतिहास आणि तत्व माहीत आहे, अशा सुज्ञ जनतेला मला इथे एक प्रश्न विचारावासा वाटतो. आज जर छत्रपती शिवाजी महाराज हयात असते तर ते कुणाच्या बाजूने उभे राहिले असते? जिच्यावर सामूहिक बलात्कार करून मुलांची आणि कुटुंबीयांची तिच्या डोळ्यादेखत हत्या करण्यात आली, अशा स्त्रीच्या बाजूने? की मतांच्या राजकारणासाठी बलात्कार आणि खून करणाऱ्या गुन्हेगारांची सुटका व्हावी, यासाठी आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून राज्य आणि केंद्रीय यंत्रणांवर दबाव आणला अशा लोकांच्या बाजूने? असा सवाल त्यांनी केला आहे.

हेही वाचा – Bhujbal On Damania : भाजपामध्ये जाण्याच्या चर्चेवर छगन भुजबळ म्हणाले; “मला कोणतीही ऑफर नाही”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -