घरमहाराष्ट्र14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार उद्धव ठाकरेंचा भाजप, मनसेला इशारा

14 तारखेला अनेकांचा मास्क काढणार उद्धव ठाकरेंचा भाजप, मनसेला इशारा

Subscribe

आज खूप दिवसांनी मास्क काढून माईकपुढे बोलत असल्याने बरे वाटत आहे. पाणी देण्याचा कार्यक्रम अत्यंत स्तुत्य असल्याने मला या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचे राजकारण आणायचे नाही, परंतु येत्या 14 तारखेला मी अनेकांचा मास्क काढणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि मनसेला दिला. मुंबईमध्ये राहणार्‍या झोपडपट्टी व निवासी इमारतींमधील रहिवाशांनाही नळजोडणी मिळावी यासाठी मुंबई महापालिकेच्या सर्वांसाठी पाणी धोरण या योजनेचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेचा सर्वांसाठी पाणी हा अत्यंत चांगला कार्यक्रम आहे. त्यामुळे मला या कार्यक्रमात कुठल्याही प्रकारचे राजकारण आणायचे नाही. मी पाणी गढूळ करू इच्छित नाही. 14 तारखेला माझी सभा आहे. त्यात माझ्या मनात आहे ते मी बोलणार आहे. माझे मन तुंबलेले नाही, पण मनात काही गोष्टी आहेत. त्या बोलणार आहे. प्रत्येकाला कुठे काय बोलायचे याचे भान आणि ज्ञान असले पाहिजे, असा टोला उद्धव ठाकरेंनी विरोधकांना लगावला. मी अनेक दिवसांनी माईकसमोर मास्क काढला आहे. तसा मास्क मी 14 तारखेला अनेकांचा काढणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

- Advertisement -

विचारांचे प्रदूषण
हल्ली विचारांचे प्रदूषण होत आहे. कोणीही काहीही बोलत आहेत. विकृत विचार मांडले जात आहेत. राजकारण जरूर करा, पण त्यात एक दर्जा असला पाहिजे. नुसता विरोध करणे म्हणजे विरोधी नाही. सरकारने चांगले काम केले, तर सांगणे ही दिलदारी आहे, पण आता ती दिसत नाही, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला.

थापा मारणारे खूप
मागील काही दिवसांपासून मुंबई महापालिकेच्या कामांना जाणीवपूर्वक नावे ठेवली जात आहेत. शहरात ठिकठिकाणी पाणी तुंबत असल्याचे सारखे दाखवले जाते. मुंबईची रचना समुद्र सपाटीपासून खाली असल्यानेच अनेक ठिकाणी पाणी साचते. हे पाणी साचू नये म्हणून आपण सातत्याने प्रयत्न करीत आहोत. हिंदमाता तुंबणार नाही यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. हल्ली थापा मारण्याची फार सवय आहे. अच्छे दिन येतील, असे म्हटले होते, पण आता वाट बघतोय. अशा थापा चालणार नाहीत. बाकीचेही थापा मारणारे खूप आहेत, पण केलेल्या कामाबद्दल कौतुकाची थाप मारणारे खूप कमी आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -