घरमहाराष्ट्रअदृष्य शक्ती मैदानात! रश्मी ठाकरे थेट मंचावर

अदृष्य शक्ती मैदानात! रश्मी ठाकरे थेट मंचावर

Subscribe

उद्धव ठाकरेंमागे सावलीप्रमाणे उभ्या असणाऱ्या रश्मी ठाकरेंचा फोटोही आता बॅनरवर झळकायला लागलाय. मात्र इथवरचं मर्यादित न राहता रश्मी ठाकरे थेट मंचावर दिसू लागल्यात. यामुळे रश्मी ठाकरेंना मैदानात उतरवण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात येतेय का? जाणून घेऊयात

मुंबई – रश्मी उद्धव ठाकरे! महाराष्ट्राच्या वहिनीसाहेब राजकारणात थेटपणे सक्रिय नसल्या तरी महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात दबदबा असणारं व्यक्तिमत्व. गेल्या काही दिवसांपासून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोकण दौरा सुरू आहे. यातील सभांमधील फोटो, व्हिडीओ समोर येत आहेत. उद्धव ठाकरेंमागे सावलीप्रमाणे उभ्या असणाऱ्या रश्मी ठाकरेंचे फोटोही हळूहळू बॅनरवर झळकायला लागलेत. मात्र बॅनरवर फोटोपुरत्या मर्यादित न राहता आता रश्मी ठाकरे थेट मंचावर दिसू लागल्यात. यामुळे रश्मी ठाकरेंना मैदानात उतरवण्याची तयारी शिवसेना ठाकरे गटातर्फे करण्यात येतेय का? असा सवाल उपस्थित होतोय.

ठाकरेंचा कोकण दौरा, बॅनरवर रश्मी ठाकरे

उद्धव ठाकरेंचा झंझावती कोकण दौरा सुरू आहे. सभा कोणतीही आणि कुठेही असो उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक सभेत रश्मी ठाकरेंची उपस्थिती दिसत आहे. यंदा कोकण दौऱ्यातील सभेवेळी ठाकरे घराण्यातील तिन्ही जनरेशनच्या फोटोसह बॅनरवर रश्मी ठाकरे यांचेही फोटो लागलेत. यामुळे शिवसेनेत असलेलं त्यांच महत्त्व जास्त अधोरेखित होतंय.

- Advertisement -

रश्मी ठाकरेंमध्ये माँसाहेब दिसतात

नाशिकमध्ये पार पडलेल्या राज्य अधिवेशनावेळी आमदार भास्कर जाधव यांनी ‘रश्मी वहिनींमध्ये मला मॉंसाहेब दिसतात, रश्मी ठाकरेंनी बाहेर पडायला हवं’ असं विधान केलं होतं. यानुसार रश्मी ठाकरे यांची बाहेर पडायची तयारी सुरू झाली आहे, असं म्हणायला वाव मिळतोय.

शिवसेना ठाकरे गटाचा कोकण जनसंवाद दौरा

रत्नागिरीतील राजापूरमध्ये जनसंवाद यात्रा पोहोचली यावेळी रश्मी ठाकरे थेट मंचावर उपस्थित असल्याचं पहायला मिळालं. एरवी दसरा मेळावा असो किंवा बंदिस्त सभागृहातील भाषण रश्मी ठाकरे या कायम मंचाच्या समोर बसून भाषण ऐकतात. मात्र उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी कायम समोर बसणाऱ्या रश्मी ठाकरे मंचावर दिसत आहेत. याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

- Advertisement -

रश्मी ठाकरे यांचे शिवसेनेतील स्थान

रश्मी ठाकरेंचं शिवसेनेत स्थान काय? याबद्दल सांगायचे झाल्यास पडद्याच्या मागे राहून शिवसेनेची राजकीय सूत्रं सांभाळणाऱ्या म्हणून रश्मी ठाकरे त्यांचा उल्लेख केला जातो. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत, आदित्य ठाकरेंनी निवडणुकीत उतरावे यामागे रश्मी ठाकरेंचाच हात असल्याचं बोललं जातं. इतकंच काय तर, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर ‘सामना’च्या संपादकपदाची धुरा रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली. रश्मी ठाकरे जरी एकही शब्द माध्यमांसमोर बोलत नसल्या तरी शिवसेनेतील राजकारणात ‘अदृष्य शक्ती’ म्हणून त्या काम करतात, हे मात्र नक्की.


हे ही पाहा – Uddhav Thackeray LIVE | उद्धव ठाकरे लाइव्ह

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -