घरमहाराष्ट्रUddhav Thackeray: सांगलीची जागा काँग्रेसला सोडणार? उद्धव ठाकरे चर्चेस तयार, तिढा सुटणार

Uddhav Thackeray: सांगलीची जागा काँग्रेसला सोडणार? उद्धव ठाकरे चर्चेस तयार, तिढा सुटणार

Subscribe

सांगली: सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. या जागेचा काँग्रेसकडून अजूनही आग्रह केला जात आहे. पण ही जागा शिवसेनेकडेच( उद्धव ठाकरे गट) राहणार असंच दिसत असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवरून काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार आहेत. त्यामुळे लवकरच या जागेवर तोडगा निघेल, असं म्हटलं जात आहे. (Uddhav Thackeray Will leave Sangli seat to Congress Uddhav Thackeray is ready for discussion the rift will be resolved)

सांगली लोकसभा मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी घोषित केली. या जागेचा काँग्रेसकडून अजूनही आग्रह केला जात आहे. पण ही जागा शिवसेनेकडेच( उद्धव ठाकरे गट) राहणार असं दिसत असतानाच आता उद्धव ठाकरे यांनी नरमाईची भूमिका घेतल्याचं बोललं जात आहे. उद्धव ठाकरे सांगलीच्या जागेवरून काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार आहेत. त्यामुळे लवकरच या जागेवर तोडगा निघेल, असं म्हटलं जात आहे. दिल्लीतून महाराष्ट्रात आल्यानंतर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांसह आमदार विश्वजित कदम यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्याचं चर्चेत ठरल्याचं, विश्वजित कदम यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं.

- Advertisement -

आमदार विश्वजित कदम म्हणाले, सांगली लोकसभा मतदारसंघ लढवण्याबाबत आम्ही ठाम आहोत. काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश आहे. हे वातावरण नक्कीच काँग्रेसला ताकद देणारे आहे. आम्ही शिवसेना नेतृत्वाला आज दिल्लीत त्याची कल्पना दिली आहे. त्यांनी या जागेबाबत चर्चेची तयारी दर्शवली , हे महत्त्वाचे आहे. चर्चेतून नक्कीच मार्ग निघेल आणि महाविकास आघाडीच्या हिताचा निर्णय होईल,अशी मला खात्री आहे.

उद्धव ठाकरेंचं म्हणणं काय?

महाविकास आघाडीत काही जागांवरून पेच आहे? उद्धव ठाकरे म्हणाले, पेच नाही. आमची जेव्हा भाजपसोबत युती होती किंवा असायची त्यावेळी शेवटच्या क्षणापर्यंत जागावाटपामध्ये थोडी खेचाखच ही व्हायची. मात्र, एकदा शिक्कामोर्तब झाल्यावर सगळे एकजिनसीपणाने काम करायचे. महाविकास आघाडीमध्येही बोलणी दोन-तीन महिने झाल्यानंतर हे सगळं झालेलं आहे. त्यांनी सुद्धा हे समजून घेतल्यासारखचं आहे. आम्ही जिंकण्याच्या ईर्षेने लढत आहे.

- Advertisement -

(हेही वाचा: Modi VS Raut : मोदींकडून आचारसंहितेचे उल्लंघन, तक्रार करणार; पंतप्रधानांच्या मुंबई दौऱ्यावर राऊतांची टीका)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -