घरमहाराष्ट्रभाजपच्या माकडचाळ्यांना उद्धव ठाकरे भीक घालणार नाहीत, भास्कर जाधव कडाडले

भाजपच्या माकडचाळ्यांना उद्धव ठाकरे भीक घालणार नाहीत, भास्कर जाधव कडाडले

Subscribe

23 तारखेला माननीय बाळासाहेबांच्या जयंतीदिवशी उद्धव ठाकरेंनी केलेलं भाषण आपण ऐकलं असेल, तर भारतीय जनता पार्टीनं त्यांना दबावाखाली आणणं हे विसरून जावं. एवढंच मी त्यांना सांगतो. यापेक्षा मी त्यांना काही सांगत नाही. मला असं वाटतं की, उद्धवसाहेबांनी दबावाखाली येण्याचं काही कारण आहे, असं मला वाटत नाही.

मुंबईः उद्धव ठाकरेंचा स्वभाव मी जवळून पाहतोय. तो पाहता असल्या माकडचाळ्यांना मी त्याला माकडचाळे म्हणतोय. हे जे भारतीय जनता पार्टीचे माकडचाळे आहेत ना, त्या माकडचाळ्यांना उद्धव ठाकरे भीक घालतील असं मला वाटत नाही, असं शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव म्हणालेत. भास्कर जाधवांनी आज माय महानगरशी संवाद साधलाय, त्यावेळी ते बोलत होते.

23 तारखेला माननीय बाळासाहेबांच्या जयंतीदिवशी उद्धव ठाकरेंनी केलेलं भाषण आपण ऐकलं असेल, तर भारतीय जनता पार्टीनं त्यांना दबावाखाली आणणं हे विसरून जावं. एवढंच मी त्यांना सांगतो. यापेक्षा मी त्यांना काही सांगत नाही. मला असं वाटतं की, उद्धवसाहेबांनी दबावाखाली येण्याचं काही कारण आहे, असं मला वाटत नाही. ते दबावाखाली येतील अशी यत्किंचितही शंका माझ्या मनामध्ये येत नाही, असंही भास्कर जाधवांनी अधोरेखित केलंय.

- Advertisement -

मी बघतोय सकाळपासून सगळेच भारतीय जनता पार्टीचे नेते सगळा राग, रोष आणि टीकेचे बाण हे माझ्यावर सोडतायत. माझ्या आयुष्यात असे शाब्दिक बाण तर सोडा, प्रत्यक्ष संघर्षाला भास्कर जाधव कधीच पाठ फिरवणार नाही. त्यामुळे ते कुठल्याही टोकाला जातील, त्या सगळ्यांबरोबर लढाई करायला मी समर्थ आहे. माझ्या निर्णयामुळे पक्षाची मान तेव्हाही उंचावली होती. आज मी सातत्याने भूमिका मांडतोय, ती भूमिका सर्वदूर गेली तर मी पुन्हा सांगतो की पक्षाची मान ताठच होईल. आपला एक कार्यकर्ता सुप्रीम कोर्टाची भीती दाखवून माझं तोंड बंद करण्याचा जो प्रयत्न होतोय. त्याला सुद्धा मी डगमगणार नाही, असंही भास्कर जाधव म्हणालेत.

सुप्रीम कोर्ट जरी न्याय पालिका म्हणून सर्वोच्च असलं, तरी त्याच्या वरती बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं प्रत्येक नागरिकाला आपलं मत मांडण्याचं आपलं म्हणणं सांगण्याचं आणि आपले त्याचबरोबर सत्य काय आणि असत्य काय याच्याकरिता संघर्ष करण्याचा अधिकार घटनेनं एक नागरिक म्हणून मला दिलेला आहे. सुप्रीम कोर्टाची जरी भारतीय जनता पार्टीनं मला भीती घातली. त्यांच्या कुठल्याही सरकारी यंत्रणेच्या चौकशीची मला भीती घातली. तरी असल्या गोष्टींना भास्कर जाधव भीक घालणार नाही. तो सत्याकरिता संघर्षच करत राहील आणि संघर्षच करत राहील एवढंच मला त्यांना सांगायचंय. त्यामुळे त्यांनी माझ्यावर किती टीकेचे वाकबाण सोडायचे आहेत तेवढे सोडू देत. कितीही संघर्ष करायची माझ्यावर वेळ आली तरी माझी तयारी आहे. मी पक्षाचीही मान खाली होऊ देणार नाही. स्वतःही कधी मान खाली घालून जगणार नाही, असंही भास्कर जाधवांनी नमूद केलंय.

- Advertisement -

हेही वाचाः budget 2022 : अनंत नागेश्वरन बनले देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -