घरठाणेमुंब्य्रातील वाद आणखी चिघळणार? पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला उद्धव ठाकरे देणार भेट

मुंब्य्रातील वाद आणखी चिघळणार? पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला उद्धव ठाकरे देणार भेट

Subscribe

2+ नोव्हेंबरला ठाण्यातील मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात असलेली 22 वर्षे जुनी शाखा पाडण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर चालवून ती शाखा पाडण्यात आली. ज्यामुळे आता आज (ता. 11 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाच्या काही नेत्यांसह या पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला भेट देणार आहेत.

ठाणे : शिवसेनेत फूट पडल्यापासून कायमच शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यामध्ये वाद पाहायला मिळत आहे. आता या दोन्ही गटात पुन्हा एकदा नव्या कारणामुळे वादाला सुरुवात झाली आहे. कारण 2 नोव्हेंबरला ठाण्यातील मुंब्रा येथील शंकर मंदिर परिसरात असलेली 22 वर्षे जुनी शाखा पाडण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या मध्यवर्ती शाखेवर बुलडोझर चालवून ती शाखा पाडण्यात आली. ज्यामुळे आता आज (ता. 11 नोव्हेंबर) उद्धव ठाकरे हे ठाकरे गटाच्या काही नेत्यांसह या पाडलेल्या शाखेच्या ठिकाणाला भेट देणार आहेत. परंतु, त्याआधीच मुंब्य्रातील राजकीय वातावरण हे चांगलेच तापलेले पाहायला मिळत आहे. (Uddhav Thackeray will visit the site of the demolished branch in Mumbra)

हेही वाचा – अजितदादांच्या दिल्ली भेटीने शिंदे गटात तणाव; अमित शहा यांच्याशी राजकीय चर्चा!

- Advertisement -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे राजन किणी यांच्या नेतृत्वाखाली 40 ते 50 जणांचा जमावाने गुरुवारी 2 तारखेला मुंब्रा येथील शाखेत घुसून ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखाला बाहेर काढले. तसेच, शाखेवरील बोर्डही काढला आणि शिंदे गटाचा बोर्ड लावला. त्यानंतर शाखेवर बुलडोझर चालवून बुलडोझर चालवून ती भुईसपाट केली, अशी माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आली होती. परंतु, त्याजागी आता नवीन शाखेची वास्तू उभारली जाणार असल्याने ती जुनी शाखा तोडण्यात आल्याचे शिंदे गटाकडून स्पष्ट करण्यात आले.

परंतु, घडलेल्या घटनेमुळे संतप्त झालेले ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे आज मुंब्य्रात येणार आहेत. आज सायंकाळी 4 वाजता उद्धव ठाकरे मुंब्य्रातील तोडलेल्या शाखेला भेट देणार आहेत. यावेळी शिवसेना नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत, खासदार राजन विचारे यांच्यासह अन्य नेते आणि ठाकरे गटाचे पदाधिकारी हे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परंतु, उद्धव ठाकरे येणार असल्याने पोलिसांनी 144 कलम लावण्याचा इशारा दिल्याची माहिती ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. शाखेच्या जागेभोवती बॅरिकेड लावून प्रवेशबंदी करण्यात येत आहे. मात्र अशा दडपशाहीला आम्ही जुमानणार नाही. आम्ही मुंब्य्रातील शिवसेना पक्षाच्या शाखेत जाणार, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी दिला आहे. तर उद्धव ठाकरे हे आज मुंब्य्रातील पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पदाधिकाऱ्यांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -