घरमहाराष्ट्रमनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, खारघर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची भाजपवर आगपाखड

मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, खारघर प्रकरणावरून उद्धव ठाकरेंची भाजपवर आगपाखड

Subscribe

खारघर प्रकरणावरून ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी यावरून जोरदार हल्लाबोल देखील केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

मुंबई : ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देण्यात आला. हा सोहळा नवी मुंबईतील खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. पण या कार्यक्रमामध्ये उष्माघातामुळे १४ श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी राज्यातील राजकारण तापले असून या मुद्द्यावरून विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आरोप करण्यात येत आहेत. या प्रकरणी आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी केली आहे. तसेच त्यांनी यावरून जोरदार हल्लाबोल देखील केला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे खारघर दुर्घटनेच्या ठिकाणी का गेले नाही? आत्ता कुठे आहेत ते. तर या प्रकरणी जर का कोणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली असेल, तर त्यामध्ये चुकीचे काय आहे आणि मागणी करण्यापेक्षा त्यांनी स्वतः या प्रकरणाची जवाबदारी घेऊन राजीनामा दिला पाहिजे.

- Advertisement -

याआधी देखील आशा भोसले यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यासाठी कार्यक्रम झालेला आहे. त्यावेळी तर सर्व काही नीट झाले होते. असे नाही की, असा कार्यक्रम पहिल्यांदाच झाला आहे. पण जर का इतका भव्यदिव्य कार्यक्रम आयोजित करायचाच होता तर त्याचे तसे नियोजन करणे देखील गरजेचे होते, असेही यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

वापरा आणि फेका हे भाजपचे वैशिष्ट्य
खारघरमधील महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात ज्या श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे, त्याप्रकरणी भाजपकडून अप्रत्यक्षपणे आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जबाबदार ठरविण्यात येत आहे. याबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, वापरा आणि फेका हे तर भाजपचे वैशिष्ट्य आहे. जेव्हा एखादी गोष्ट त्यांच्या अंगलट येते, तेव्हा त्या गोष्टीचे खापर भाजप दुसऱ्यांवर फोडून मोकळे होते, हे देखील त्यांचे वैशिष्ट्य आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीका केली आहे.

- Advertisement -

भाजपला मतांचे राजकारण करायचे होते का?
या सोहळ्यासाठी अमित शाह हे दिल्लीवरून मुंबईला आले. त्यामुळे या कार्यक्रमासाठी जमलेल्या गर्दीच्या मतांचे राजकारण त्यांना करायचे होते का? याआधी ज्यावेळी नानासाहेबांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी सुद्धा लाखो लोकं आले होते. कारण धर्माधिकारी हे त्यांच्या घरांघरांत गेलेले आहेत. त्यामुळे लोक मोठ्या संख्येने येत असतात. पण हे लोक केवळ मतदार व्हावे म्हणून हा कार्यक्रम आयोजित केला होता का? असा प्रश्न देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून उपस्थित करण्यात आला.


हेही वाचा – धाराशिव नव्हे ‘उस्मानाबाद’ हेच नाव वापरा, उच्च न्यायालयाचा आदेश!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -