घरताज्या घडामोडीठाकरेंच्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातील 'हे' सहा मंत्री

ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मराठवाड्यातील ‘हे’ सहा मंत्री

Subscribe

मराठवाड्यातील ६ मंत्री आज मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. यामध्ये दिग्गजांसह नवोदितांचा देखील समावेश आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. या मंत्रिमंडळात मुंबईतील ५ जणांचा समावेश असताना मराठवाड्याला न्याय देण्यात आला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील ६ मंत्री आज मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. यामध्ये दिग्गजांसह नवोदितांचा देखील समावेश आहे.

‘या’ सहा जणांचा समावेश

गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आज पूर्णत्वास येत आहे. त्यानुसार आज महाविकास आघाडीच्या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडत आहे. या मंत्रिमंडळात मराठवाड्यातील ६ जणांना संधी देण्यात आली आहे. तिन्ही पक्षांकडून प्रत्येकी दोन जणांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख, राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडे आणि राजेश टोपे आणि शिवसेनेकडून आमदार संदिपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. संदीपान भुमरे यांना कॅबिनेट मंत्रिपद तर अब्दुल सत्तार यांना राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. विशेष म्हणजे धनंजय मुंडे हे प्रथमच मंत्रिमंडळात दिसणार आहेत.

हेही वाचा – मुंबईकरांचं आता तरी भलं होणार? एकट्या मुंबईतून ५ कॅबिनेट मंत्री!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -