घरमहाराष्ट्रनाशिकअद्वय हिरेंच्या अटकेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले; "आमचे सरकार आल्यावर..."

अद्वय हिरेंच्या अटकेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले; “आमचे सरकार आल्यावर…”

Subscribe

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते अद्वय हिरे यांनी रेणुकादेवी सुत गिरणी संस्थेसाठी नाशिक जिल्हा बँकेकडून कर्ज थकविल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी नाशिक पोलिसांनी बुधवारी (१५ नोव्हेंबर) अद्वय हिरे यांना भोपाळमधून अटक केली. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद घेतली. आमचे सरकार आल्यावर सगळ्यांचा हिशोब करणार, असा थेट इशारा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिला आहे.

अद्वय हिरे यांच्या अटेकप्रकरणी उद्धव ठाकरे म्हणाले, “संपूर्ण पक्ष हा अद्वय हिरेंच्या पाठिशी असून त्यांच्यावर कारवाई केली जाते. पण आम्ही आरोप करणाऱ्यांची चौकशी देखील होत नाही. आमचे सरकार आल्यावर सगळ्यांचा हिशोब करणार”, असा थेट इशारा त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. अद्वय हिरेंना पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने अद्वय हिरेंला 20 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – अद्वय हिरेंवरील कारवाई राजकीय दबावातून, संजय राऊतांचे सरकारवर गंभीर आरोप

दादा भुसेंच्या आरोपावर संयज राऊतांचा पटलवार

अद्वय हिरेंच्या अटकेवर मंत्री दादा भुसे म्हणाले, “गिरणा सहकारी साखर कारखान्यांच्या शेअर्समध्ये 178 कोटींची अफरातफर केली आहे, असा आरोप दाद भुसेंनी केला आहे. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दाद भुसेंवर टीका करताना म्हणाले, “अद्वय हिरेंची अटक ही राजकीय दबावमुळे झाली. भाजपमध्ये असताना आणि त्याआधी देखील होते. पण ते शिवसेनेत आले. त्यानंतर त्यांनी मालेगाव विधानसभेत उद्धव ठाकरे यांची सभा घेतली. संपूर्ण मतदारसंघ ढवळून काढला. त्यामुळे त्या मतदारसंघात ज्यांना पराभवाची भीती वाटत आहे, अशा मंत्रिमहोदयांनी शासकीय यंत्रणेचा गैरवापर करून अद्वय हिरे आणि त्यांच्या कुटुंबियांवर गेल्या वर्षभरात 40 च्या आसपास गुन्हे दाखल केले आहेत”, असे राऊत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – मोठी बातमी : शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उपनेते अद्वय हिरे पोलिसांच्या ताब्यात

नेमकं प्रकरण काय?

रेणुकादेवी यंत्रमाग औद्योगिक संस्था यावर सुमारे 32 कोटींची जिल्हा बँकेची थकबाकी आणि बँकेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालेगाव शाखेचे विभागीय अधिकारी गोरख जाधव यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रारीवरुन आयेशा नगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झाला होता. बँकेची ही केस सुमारे आठ वर्ष जुनी असल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबत कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -