घरमहाराष्ट्रउद्धव ठाकरेंची ताकद वाढणार, माजी मंत्री करणार शिवसेनेत प्रवेश

उद्धव ठाकरेंची ताकद वाढणार, माजी मंत्री करणार शिवसेनेत प्रवेश

Subscribe

मुंबई – एकीकडे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून अनेक नेते, आमदार, खासदार पक्ष सोडून जात असताना माजी मंत्री संजय देशमुख शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत. संजय देशमुख हे जुने शिवसैनिक आहेत. ते आज शेकडो कार्यकर्त्यांसह उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करणार आहेत.

हेही वाचा – शिंदे सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तारही लांबणीवर; नाराज आमदारांना यावेळी तरी संधी मिळणार?

- Advertisement -

‘मी आधी शिवसैनिकच होतो. मी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख होतो. सध्याची जी काही राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मी ठाकरे गटात प्रवेश करत’ असल्याचं संजय देशमुख यांनी म्हटलं आहे.

‘शिवसेनेने काही लोकांना सर्व काही देऊन देखील त्यांनी शिवसेनेला धोका दिला. ते पक्षातून बाहेर पडले. हे पाहून माझ्यातला शिवसैनिक जागा झाला. त्यामुळे मी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. कार्यकर्त्यांचा देखील आग्रह होता. त्यामुळे आज शेकडो कार्यकर्त्यांसह हाती शिवबंधन बांधणार’ असल्याचं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – काँग्रेसच्या तारणहार! पंतप्रधानपद नाकारून सोनिया गांधींनी सांभाळली होती पक्षाची कमान

एकनाथ  शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर अनेकांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली. निष्ठावान शिवसैनिकांनीही एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. एवढंच नव्हे बाळासाहेब ठाकरे यांची ज्याने आजन्म सेवा केली त्या चंपासिंग थापा यांनीही शिंदेना साथ दिली. त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरेंचा गट खिळखिळा होत असतानाच संजय देशमुखसारखे जुने शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत परतत असल्याने ठाकरेंना मोठी ताकद मिळणार असल्याचं बोललं जातंय.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -