घरमहाराष्ट्रठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊत दिल्ली उच्च न्यायालयात राहणार हजर?

ठाकरे पिता-पुत्रांसह संजय राऊत दिल्ली उच्च न्यायालयात राहणार हजर?

Subscribe

शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्घव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात आज सुनावणी घेतली जाणार आहे. या प्रकरणी 28 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.

दिल्ली उच्च न्यायालयात आज शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी उद्घव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात आज सुनावणी घेतली जाणार आहे. या प्रकरणी 28 मार्च रोजी झालेल्या सुनावणीत कोर्टाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे आज ते कोर्टात हजर होणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्यासह सोशल मीडियावर केली जाणाऱ्या टीकेच्या संदर्भात ही याचिका दाखल केली होती. या याचिकेवर न्यायालयात 28 मार्चला सुनावणी पार पडली. याप्रकरणी उच्च न्यायालयाने उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना समन्स बजावत 17 एप्रिलला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिले होते. (Uddhav Thackery Aditya Thackeray Sanjay Raut will be present in Delhi High Court with petition filed by MP Rahul Shewale )

- Advertisement -

( हेही वाचा: सोयीनुसार ‘महाराष्ट्र भूषण’ कार्यक्रम घेतला; संजय राऊतांचा सरकारवर आरोप )

काय आहे प्रकरण?

शिवसेनेतील 40 आमदारांनी बंड करत वेगळी भूमिका घेतली. यानंतर निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना नाव दिले. यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव देण्यासाठी 2 हजार कोटी रुपयांचा सौदा झाला होता. सहा महिन्यात न्याय विकत घेण्यासाठी हा मोठा सौदा करण्यात आला. हा न्याय नाही, ही डील आहे. हा विकत घेतलेला न्याय आहे, असा आरोप केला होता.

- Advertisement -

या प्रकरणावरील सुनावणी दरम्यान शेवाळे यांच्यावतीने सोशल मीडिया प्ल‌ॅटफाॅर्मवर म्हणजेच, गुगल, फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्वीटरवर संजय राऊत, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटातील आमदार, खासदार यांच्यासंदर्भात केलेली बदनामीकारक वक्तव्य हटवण्याची मागणी करण्यात आली होती.

या प्रकरणात सोशल मीडिया कंपन्याना बजावण्यात आलेल्या नोटीसमध्ये तुमच्या प्लॅटफाॅर्मवर अद्यापही या तिघांनी आमदार, खासदारांबाबत केलेल्या वक्तव्यांसदर्भात पोस्ट आहेत, त्या हटवण्यात का आलेल्या नाहीत? याबाबत खुलासा करण्यास सांगितलं आहे. न्यायमूर्ती प्रतीक जालान यांनी हे आदेश दिले आहेत. राहुल रमेश शेवाळे यांच्यावतीने वरिष्ठ वकील राजीन नायर आणि अरविंद वर्मा, चिराग शाह आणि उत्सव त्रिवेदी यांनी न्यायालयात बाजू मांडली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -