ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्ट माध्यमातून सामनाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. माझ्याविरुद्ध आख्खा भाजप असून त्यांना ठाकरेंची भीती वाटते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरेंची भीती का वाटते?
एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही एका व्यक्तीविरोधात ही लढाई नाही. जसं आज माझ्याविरुद्ध आख्खा भाजप आहे. त्यांचा कोणताही नेते आला तर त्यांना उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे काही बोलता येत नाही. आता खरं तर उद्धव ठाकरेंकडेच आहेच काय? पक्ष नाही, शिवसेना तुम्ही चोरली आहे. चिन्ह चोरलं आहे. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील तुम्हाला उद्धव ठाकरेंची भीती का वाटते? असा सवाल उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला आहे.
मला असं वाटतं की, उद्धव ठाकरे ही एकटी व्यक्ती नाही तर उद्धव ठाकरे म्हणजे बाळासाहेबांचे विचार आहेत. तसेच मोदींच्या विरोधात ही लढाई नाही तर ती हुकूमशाहीविरोधातील लढाई आहे. मला भाजपची चिंता नाही. प्रत्येकाला जावंच लागतं. पण भाजप पाडत असलेला पायंडा हा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझंच बनणार! असं जर का चालू राहिलं तर कठीण आहे. ज्या पद्धतीने आता हे महाराष्ट्रातील सरकार स्थापन झालंय, ते कसं झालंय हे गावागावातलं अगदी साधं पोरसुद्धा सांगेल की, कसे हे जन्माला आले आहेत. अशा पद्धतीने उद्या कोणीही… म्हणजे खोके सरकार म्हणतात त्याला… उद्या खोके घेऊन येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आज विरोधकांकडून पाळला जाणार काळा दिवस-राऊत
आताचं हिंदुत्व वेगळं आहे का?
आताचं हिंदुत्व वेगळं आहे का? असा प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरे म्हणाले की, आता त्यांचं हिंदुत्व तपासण्याची वेळ आहे. हे एवढ्यासाठीच मी म्हणतो, तेव्हा जनसंघाची किंवा यांची घोषणा होती, एक विधान, एक निशाण, एक प्रधान. आता त्याच्यात त्यांनी जोडलंय एकच पक्ष. जे मी आणि जनता कदापी मान्य करू शकत नाही. देश एक मान्य. एक निशाण मान्य. एक प्रधान म्हटलं तर तो जनतेने निवडून दिलेला आहे. पण एक पक्ष जर तुम्ही बोलणार असाल तो आम्ही कदापीही मान्य करणार नाही, असंही ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : ‘मी खंजीर खुपसलाय म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं?’, उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना