घरमहाराष्ट्रUddhav Thakceray : काय अशोकराव जागे आहात की झोपलात? उद्धव ठाकरेंचा मिश्कील...

Uddhav Thakceray : काय अशोकराव जागे आहात की झोपलात? उद्धव ठाकरेंचा मिश्कील टोला

Subscribe

कोकण दौरा आटोपून मराठवाडा आणि आज अहमदनगर दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रीरामपूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अशोक चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.

श्रीरामपूर (अहमदनगर): शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आज अहमदनगर दौऱ्यावर असून, श्रीरामपूर येथे आयोजित सभेत त्यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. भाजपमध्ये गेल्यावर ईडी वगैरे काही नाही, आता छान झोप लागते असे म्हणणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांच्या त्या वाक्याचा संदर्भ घेत उद्धव ठाकरे यांनी आता मला असं वाटते की, अशोकरावांना फोन केल्यानंतर विचारावं काय अशोकराव जागे आहात का झोपलात? असं विचारावं असं म्हणत त्यांनी अशोक चव्हाणांना मिश्कील टोला लगावला. (Uddhav Thakceray Are Ashokrao awake or asleep Uddhav Thackerays Mishkeel Tola)

कोकण दौरा आटोपून मराठवाडा आणि आज अहमदनगर दौऱ्यावर असलेले माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची श्रीरामपूरमध्ये सभा आयोजित करण्यात आली. या सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपसह अशोक चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. आयोजित सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोरोना काळात सुरक्षित अंतर ठेवा असे सांग हुकूमशहाच्या व्हायरसच्या दोन हात लांब रहा. भाजपला आज मोठा धक्का बसला आहे. एक भ्रष्टाचारी भाजपमध्ये आहा हा भाजपला धक्का आहे. हा आम्हाला धक्का नाही. शिवसेना दुसऱ्यांना धक्का देते. असे अनेक आले गेले. निसर्गाच्या नियमानुसार, सडलेली पानं गळतायेत आणि पडतायेत. त्यानंतर नवीन अंकूर येत असतात.

- Advertisement -

हेही वाचा : Vetri Duraisamy : तमिळ दिग्दर्शक वेत्री दुराईसामी यांचं अपघाती निधन! नऊ दिवसांनंतर सापडला मृतदेह

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काँग्रेसमधून गेलं की, काँग्रेसला धक्का. राष्ट्रवादीतून गेलं की, राष्ट्रवादीला धक्का. पण हे धक्के खरे भारतीय जनता पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बसत असतात. कारण ज्यांच्या विरुद्ध लढले ज्यांच्यावर काय- काय आरोप केले होते. भ्रष्टाचारी म्हणून आरोप केले. तेव्हा भ्रष्टाचारी भाजपामध्ये आला हा भाजपला मोठा धक्का आहे. हा आम्हाला हा धक्का नाही, हा महाविकास आघाडीला बिलकुल नाही, ना काँग्रेसला, ना राष्ट्रवादीला आणि शिवसेनेला तर नाहीच नाही. कारण शिवसेना ही इतरांना धक्के देत आलेली आहे. शिवसेनेला आता धक्क्याची तशी सवय झालेली आहे. असे अनेक आले आणि अनेक गेले. पण प्रत्येक वेळेला नवीन पालवी, नवीन जसे कोंब फुटावे तशी पुन्हा शिवसेनेचा जो वृक्ष आहे. तो हिरवागार होऊन जातो. निसर्गाच्या नियमाप्रमाणे पानगळी असतेच आणि सडलेली पानं ही झडलीच पाहिजेत, जी पानं सडलीत, ती पानं झडतायेत. असे म्हणत त्यांनी अशोक चव्हाण यांचं नाव न घेता त्यांच्यावर बोचरी टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा : Atal Setu: अटल सेतूवर बेस्ट पाठोपाठ आता NMMT ही धावणार

हीच का तुमही मोदी गॅरंटी

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपच्या नेत्यांची पत्रकार परिषद बघत होतो. भाजपमधील एक नेते आहेत की ज्यांची बोलायचीसुद्धा लायकी नाही. त्यांना विचारलं की, तुम्ही अशोक चव्हाणांचा डीलर म्हणून उल्लेख केला होता. आता तुम्ही त्यांना लीडर केलंत का? यासोबतच आदर्श घोटाळ्याबद्दलही विचारलं, तर ते म्हणाले मी तुला नाही उत्तर देणार नाही. उत्तर देणार नाही म्हणजे काय? जनता तुम्हाला विचारते की, तुम्ही जे काही सांगितलं होतं भ्रष्टाचारांना स्थान नाही. मग मला आता मोदींना विचारायचं आहे की, मोदीजी तुम्ही जी सगळीकडे मोदी गॅरंटी, मोदी गॅरंटी म्हण फिरता ती हीच मोदी गॅरंटी आहे का? आम्ही भ्रष्टाचाराचे आरोप करू, तुम्ही किती मोठा भ्रष्टाचार करा. पण भाजपात आल्यानंतर तुम्हाला ताबडतोब राज्यसभा मिळेल. उपमुख्यमंत्रीपद मिळेल, मुख्यमंत्रीपद मिळेल, ईडी,income tax, सीबीआय तुमच्याकडे येणार नाही. ही मोदी गॅरंटी आहे. असं म्हणत त्यांनी भाजपावर जोरदार हल्ला चढवला.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एकीकडे मोदी गॅरंटी वाटत फरित असताना शेतकऱ्यांना कोण गॅरंटी देणार? आज सर्वत्र फिरत असताना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसून येत असल्याचेही ते म्हणाले.

…मग मोदींना स्वप्त पडतात कधी?

भाजपमध्ये या आणि तुमच्यावरील सगळे आरोप साफ होतील. ही मोदी गॅरंटी आहे असं म्हणतात. पण शेतकऱ्यांना कोण गॅरंटी देणार. जो आपल्याला जगवतोय तो शेतकरी विचारतोय की, आम्ही जगायचं कसं? कारण आमच्या डोक्यावर कर्ज आहे. मराठवाड्यातील शेतकरी चिंताक्रांत असताना अशोक चव्हाणांनी शेतीच्या बांधावर जायाला हवं होतं की, मोदींच्या दारावर जायाला हवं होतं. असे असतानाच आज पत्रकार परिषदेमध्ये ते म्हणत होते की, आम्ही मोदींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही भाजपामध्ये गेलो, अरे पण आम्ही तर ऐकलं की, मोदी तीनच तास झोपतात, मग त्यांना स्वप्न पडतात कधी? आणि त्यांना पडलेली स्वप्न तुम्हाला कळतात कशी? झोपतात ते आणि स्वप्न पूर्ण करतात हे. अरे ज्यांचं स्वप्न आहे त्यांनी पूर्ण करायला हवं ना.

त्याच पत्रकार परिषदेत हर्षवर्धन पाटीलही होते ते भाजपमध्ये गेल्यावर म्हणाले होते की, आता ईडी वगैरे काही नाही, आता चांगली झोप लागते. तेव्हा आता माझा विचार आहे की, अशोक चव्हाणांना फोन केला तर विचारवं अशोकराव जागी आहात की, झोपलात गेले मी त्यांना रात्री अपरात्री फोन करुन विचारणार झोपलेत की जागी आहात असाही मिश्कील टोला त्यांनी यावेळी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -