घरमहाराष्ट्रउजनीचा उजवा कालवा फुटल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली, नेमकं काय घडलं?

उजनीचा उजवा कालवा फुटल्यानं शेकडो एकर शेती पाण्याखाली, नेमकं काय घडलं?

Subscribe

उजवा कालवा ११२ किमीचा आहे. रविवारी पहाटे पाटकुल ओढ्याजवळ हा कलवा अचानक फुटला. पाणी वेगाने आसपासच्या परिसरात शिरले. शेती व शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. पहाटेच्या वेळीस ही घटना घडल्याने स्थानिक नागरिकांना सुरुवातीला काहीच कळाले नाही.

सोलापूरः मोहोळ तालुक्यातील पाटकुल गावातील उजनी पाटबंधारे विभागाचा उजवा कालवा रविवारी पहाटे फुटला आहे. कालवा फुटल्याने डाळिंबासह ऊस व इतर पिके वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरले आहे. शेकडो एकर क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. पावसाविना आलेल्या या संकटामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

उजवा कालवा ११२ किमीचा आहे. रविवारी पहाटे पाटकुल ओढ्याजवळ हा कालवा अचानक फुटला. पाणी वेगाने आसपासच्या परिसरात शिरले. शेती व शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरल्याने एकच गोंधळ उडाला. पहाटेच्या वेळीस ही घटना घडल्याने स्थानिक नागरिकांना सुरुवातीला काहीच कळाले नाही. पाऊस नाही पडला. मग कालव्यातून एवढे पाणी कसे बाहेर आले. धरण फुटले का, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मात्र नंतर उजवा कालवा फुटल्याचे स्पष्ट झाले व सर्वांचाच जीव भांड्यात पडला.

- Advertisement -

घरात पाणी शिरल्याने प्रत्येकजण किमती वस्तूंचे नुकसान होऊ नये यासाठी धडपड होता. पाण्याची तीव्रता कमी झाल्यावर शेतकरी शेतीजवळ गेले. डाळिंब, ऊसाची पिके कापणीला आली होती. ही पिके पाण्यासोबत वाहून गेली. या आपत्तीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. वाहून गेलेल्या शेतीची नुकसान भरपाई कशी होणार, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

उजवा कालवा फुटल्याने पाण्याचा प्रवाह इतका मोठा होता की काही वाहने वाहून गेली. उजवा कालवा अचानक कसा फुटला. या घटनेला कोण जबाबदार आहे याची चौकशी होणार आहे. उजनी धरणातून उजव्या कालव्यामध्ये ५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरु होता. अशावेळी कालवा फुटला. या घटनेत जिवित हानी झाल्याचे वृत्त तूर्त तरी नाही. पण हा धोका मोठा होता. शेतीचे नुकसान झाल्याने त्याचे तत्काळ पंचनामे करावेत. शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई करावी, अशी मागणी होत आहे.

- Advertisement -

मुसळधार पावसाचा फटका उजनी धरणालाही बसतो. पाण्याची पातळी वाढल्यानंतर धरणातून पाणी सोडावे लागते. सर्तकतेचा इशारा म्हणून धरणाच्या आसपासच्या गावांना काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. मात्र उजवा कालवा अचानक फुटल्याने सर्वच बेसावध होते.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -