Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सेल्फी काढणं बाप-लेकाला पडलं महागात; नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू

सेल्फी काढणं बाप-लेकाला पडलं महागात; नदीत बोट उलटून दोघांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

आपण कुठेही फिरायला गेलो की, तेथील निसर्गाचे सौंदर्य पाहून आपला सेल्फी काढण्याचा मोह होतोच, मात्र या सेल्फी काढण्याचे व्यसन तुमच्या जीवावर बेतू शकते. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोलापूरात सेल्फीच्या नादात बोट उलटून बाप-लेकाचा मृत्यू झाल्याचा दुर्दैवी प्रकार घडला असून उजनी नदीपात्रात बोटीतून फिरताना ही दुर्दैवी घटना घडली असून बोट उलटल्यानंतर मायलेकींना वाचवण्यात यश आलं आहे, परंतु बापलेकाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय.

असा घडला प्रकार

सोलापूरातील राहणारे शेंडगे परिवार रविवारी संध्याकाळी उजनी पात्रात बोटीतून फिरण्यास निघाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, नदीच्या किनार्‍यापासून बोट ३०० मीटर अंतरावर गेल्यानंतर सर्वांना सेल्फीचा मोह आवरला नाही. यावेळी बोटीत एकत्रितपणे सर्वांनी सेल्फी काढण्याचा प्रयत्न केला, मात्र हा सेल्फी काढत असताना नदीच्या पाण्यात बोट उलटली. सेल्फी काढत असताना सर्वांचा तोल गेल्याने बोट पाण्यात उलटली आणि शेंडगे कुटुंबीयांसह बोटीतील इतर प्रवासीही पाण्यात बुडाले. स्थानिकांच्या मदतीने पत्नी स्वाती शेंडगे, मुलगी अंजली विकास शेंडगे यांच्यासह अन्य चार जणांना पाण्यात बुडण्यापासून बचावले.

- Advertisement -

करमाळा तालुक्यातील वांगी या ठिकाणी वडील विकास गोपाळ शेंडगे, अजिंक्य विकास शेंडगे यांचा दुर्दैवाने नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे शेंडगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -