घरताज्या घडामोडीउल्हास नदीच्या पाणीपात्रात घट, पूरसंकट तूर्तास टळले

उल्हास नदीच्या पाणीपात्रात घट, पूरसंकट तूर्तास टळले

Subscribe

राज्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. काल बुधवारी सायंकाळी उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली होती. त्यामुळे बदलापूरकरांवर पुराचं संकट येण्याची शक्यता होती. त्यामुळे नदी काठच्या लोकांना पालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलवले होते. मात्र गुरुवारी सकाळी नदीच्या पाणी पातळीत घट झाल्याने, बदलापूरकरांवरील “पूरसंकट” तूर्तास टळले आहे.

पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहिती नुसार उल्हास नदीची पाणी पातळी बुधवारी सायंकाळी पाचनंतर हीच पाणी पातळी १७.७० पर्यंत पोहोचली होती,तर गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास १४.९० मीटर इतकी होती. बदलापूर आणि परिसरात सायंकाळनंतर पावसाचा जोर कमी झाला होता.

- Advertisement -

मात्र रायगड जिल्ह्यातील पावसामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची चिंता वाढली होती. बुधवारी सायंकाळी बदलापूरच्या सखल भागात काही ठिकाणी पाणी शिरले होते. रात्री उशिरा उल्हास नदीची पाणी पातळी घटण्यास सुरुवात झाली. बुधवारी रात्री साडे नऊ वाजता उल्हास नदी धोक्याच्या पातळीच्या खाली वाहू लागली. त्यावेळी पाणी पातळी १७.३० इतकी होती. तर रात्री बाराच्या सुमारास उल्हास नदी १६.६० मीटरवर वाहत होती. गुरुवारी सकाळी केलेल्या नोंदीनुसार उल्हास नदी १४.९० मीटरवर वाहते आहे. त्यामुळे तूर्तास पुरसंकट टळले आहे.

हेही वाचा : राज्यभरात ‘मुसळधार’; मुंबईला ऑरेंज, पालघरला रेड अलर्ट

- Advertisement -

बदलापूर आणि अंबरनाथ या शहरांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाणीपुरवठा केला जातो. बदलापुर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीवरील बॅरेज धरणातून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पाण्याचा उपसा केला जातो. याच ठिकाणी असलेल्या केंद्रातून जलशुद्धीकरण करून पाणी बदलापूर आणि अंबरनाथ शहराला पोहोचवले जाते. मात्र पावसाळ्यात उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर जलशुद्धीकरण केंद्रावर देखील त्याचा परिणाम होतो.त्यामुळे नदीची पाणी पातळी कमी होत नाही तो पर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येतो.

बदलापूर शहर हे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे.बुधवारी सायंकाळी उल्हास नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर बॅरेज धरण इथले पंपिंग स्टेशन बंद करण्याचा निर्णय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने घेतला होता.त्यामुळं बदलापूर शहर आणि अंबरनाथचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला होता.

मात्र उल्हास नदीची पाणी पातळी कमी झाल्याने बुधवारी मध्यरात्री पंपिंग स्टेशन पुन्हा सुरू करण्यात आले.त्यामुळे आता बदलापूर आणि अंबरनाथ शहराला सुरळीत पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती उप कार्यकारी अभियंता दिलीप बागुल यांनी दिली आहे.


हेही वाचा : कोकणात मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी धोकादायक पातळीवर, ३० गावांना सतर्कतेचा इशारा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -