घरक्राइमUlhasnagar Firing Case : गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिंदे गटाच्या मंत्र्यांची...

Ulhasnagar Firing Case : गणपत गायकवाडांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिंदे गटाच्या मंत्र्यांची मागणी

Subscribe

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक केले असून हा संपूर्ण प्रकार जमिनीच्या वादातून घडला आहे.

मुंबई : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे कल्याण शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केली. या प्रकरणी गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आता गणपत गायकवाड यांच्याविरोधात शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणी आज शिंदे गटाच्या सात मंत्र्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत देवेंद्र फडणवीसांनी तातडीने गणपत गायकवाड यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी भूमिका शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली आहे.

गणपत गायकवाड यांनी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या प्रकरणी तीन जणांना अटक केले असून हा संपूर्ण प्रकार जमिनीच्या वादातून घडला आहे. या प्रकरणाची फडणवीसांनी वरिष्ठ स्तरावर चौकशी करण्याचे आदेश दिले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Ulhasnagar shootout : गणपत गायकवाड यांना 14 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी

भाजपा आणि शिंदे गटात सोशल वॉर

या प्रकरणानंतर गणपत गायकवाड आणि जखमी शिंदे गटाचे महेश गायकवाड या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी फेसबुक आणि इंस्टाग्रामवर सोशल मीडियावर त्यांच्या नेत्यांचे फोटो आणि रील्स व्हायरल करत आहेत. या रील्समध्ये बॉलिवूडच्या चित्रपटाची गाणे आणि डायलॉक आहेत. यामुळे भाजपा विरूद्ध शिंदे गट वातावरण तापल्याचे आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Jharkhand Floor Test : चंपई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री; बहुमत चाचणी जिंकली

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव हा महिनाभरापासून सुरू असलेल्या जमिनीच्या प्रकरणात तक्रार देण्यासाठी शुक्रवारी (2 फेब्रुवारी) आपल्या कार्यकर्त्यांसह उल्हासनगरमधील हिल लाइन पोलीस ठाण्यात आला होता. त्याचवेळी महेश, पाटील व चैनू जाधव हे देखील आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात पोहोचले होते. त्यानंतर गणपत गायकवाड हे देखील आपल्या समर्थकांसह पोलीस ठाण्यात आले. यावेळी हिल लाइन पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकाच्या दालनात गणपत गायकवाड यांनी रात्री उशीरा महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -