Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र सरकारला अल्टिमेटम : किरीट सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना 72 तासांचा इशारा; नाही तर...

सरकारला अल्टिमेटम : किरीट सोमय्यांचा शिंदे-फडणवीसांना 72 तासांचा इशारा; नाही तर…

Subscribe

मुंबई : भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर महाविकास आघाडी सरकारच्या काळात खार पोलीस ठाण्याबाहेर हल्ला झाला होता. यावेळी ते जखमी झाले होते. या हल्ल्याला पुढील महिन्यात वर्ष होत आले तरी आरोपींना अद्याप पकडण्यात आले नाही. त्यामुळे सोमय्यांनी पोलीस खात्यावर नाराजी व्यक्त केली आहे. ७२ तासांत आरोपींवर कारवाई झाली नाही तर खार पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलन करणार असा इशारा सोमय्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिला आहे.

सोमय्या म्हणाले की, २३ एप्रिल २०२२ रोजी माझ्यावर हल्ला करत माझा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. दगडफेक करत सीआरपीएफच्या कामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला होता. याप्रकरणी आरोपींना अटक झाली नसून तपास अधिकारी बनवाबनवी करत आहेत. ७२ तासांत आरोपींना अटक झाली नाही तर मी खार पोलीस ठाण्याबाहेर धरणे आंदोलनाला बसणार आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला मी होत जोडून सांगतो, असा इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

या प्रकरणात मी उच्च न्यायालयात गेलो होतो. न्यायालयाने पोलिसांना नोटीस दिल्यानंतरही खार पोलीस हे प्रकरण गांभीर्याने घेत नाही आहेत. तक्रारीत ६४ लोकांचा उल्लेख होता, मात्र आतापर्यंत कुणालाही अटक झाली नाही. या प्रकरणातील तपास अधिकाऱ्याला तात्काळ हटवून त्याच्यावर कारवाई करावी असे मी गृह सचिवांना भेटून सांगणार आहे. ज्यांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर ७२ तासांत कडक कारवाई झाली पाहिजे, नाही तर मी धरणे आंदोलन करणार, असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

पोलिसांच्या बनवाबनवीचा निषेध
उच्च न्यायालयात सुनावणीवेळी तक्रार अपडेट करू असे पोलिसांनी सांगितले होते. परंतु माझ्यावर झाले हल्ला अजामिनपात्र गुन्हा आहे. असे असतानाही पोलिसांनी ६४ पैकी जेमतेम १३ लोकांवर २ दिवसांपूर्वी कारवाई केली. माझ्यावरील हल्ल्याचे सगळे व्हिडिओ टीव्ही चॅनेलवर दाखवण्यात आले. माझ्यावर दगड मारले, मला जखम झाली, तरीही पोलीस माझ्यावरील हल्ला गांभीर्याने घेत नसल्यामुळे मी पोलिसांच्या बनवाबनवीचा निषेध करतो, असे किरीट सोमय्या म्हणाले.

- Advertisement -

ठाकरेंनी हिंदुत्व सोडून हिरवा झेंडा हाती घेतला
राहुल गांधी सावरकरांना शिव्या देतात आणि उद्धव ठाकरे सावकरांचा अपमान सहन करणार नाही असा इशारा देतात. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा भगवा सोडून हिरवा झेंडा हाती घेतला आहे. उद्धव ठाकरे यांची २०१९ ची भाषणे ऐकली तर ते मोदी-मोदी बोलायचे, पण आता राऊतांचा कॉमेडी शो सुरू झाला आहे, असा टोला सोमय्यांनी लगावला.

- Advertisment -