Sunday, April 18, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे पोलिसांच्या हातातून गुंड गजा मारणे पुन्हा निसटला, वडगाव कोर्टातून मिळवला जामीन

पुणे पोलिसांच्या हातातून गुंड गजा मारणे पुन्हा निसटला, वडगाव कोर्टातून मिळवला जामीन

पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देत पोहचला कोर्टात, ५ हजारांच्या जात मुचकल्यावर मिळला जामीन

Related Story

- Advertisement -

पुणे, पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या हातावर तुरी देत पळणाऱ्या गुंड गजा मारणेला अखेर वडगाव मावळ कोर्टाने जामीन दिला आहे. तळेगाव पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्याप्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून पुणे, पिंपरी चिंचवड पोलीस त्याच्या शोध घेत होते. मात्र या प्रकरणात गजा मारणेने पोलिसांना खबरबात न देता जामीन मिळवला आहे. गुंड गजा मारणेने तळोजा जेलमधून सुटल्यानंतर तळोजा कारागृह ते पुणे शहरापर्यंत भव्य रॅली काढून शक्तीप्रदर्शन केले होते. या शक्तीप्रदर्शनाचे अनेक व्हिडिओ माध्यमांसमोर आल्याने अनेकांनी यावर टीकेची झोड उठवली. या भव्य शक्तीप्रदर्शना दरम्यान विना टोल केलेला प्रवास, फूड मॉल येथे करण्यात आलेली दहशत याप्रकरणी मारणे विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आला. त्याच्या शेकडो साथीदारांवरही गुन्हा दाखल झाले. या रॅलीतील 36 जणांना शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून 14 आलिशान मोटरी जप्त केल्या आहेत. त्यामुळे एखादा गुंड नियम धाब्यावर बसवत अशाप्रकारे शक्तीप्रदर्शन करत असल्याने पुणे पोलिसांच्या नावाचीही बदनामी झाली. कारण मारणेविरोधात याआधीही शेकडो गुन्हे दाखल आहेत. परंतु पुणे पोलीस खाते या रेकॉर्डवरच्या गुंडाला पकडू न शकल्याने पोलीस खात्याची अब्रु वेशीवर टांगली जात होती. या अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पुणे पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस मारणेचा शोध घेत होते.

मात्र मारणे याप्रकरणानंतर फरार झाला होता. याला शोधण्यासाठी पुणे आणि पिंपरी चिंडवड पोलिसांनी शोधण्यासाठी विशेष मोहिम हाती घेतली. परंतु एवढे असतानाही गेल्या आठ दिवसांपासून सापडला नाही. उलट मारणेने पुणे पोलीसांना चकवा देत सरळ कोर्टात हजर राहत जामीन मिळवून घेतला. मारणेला जामीन मिळाल्याने पुणे पोलीसही चक्रावले आहेत. १५ हजारांच्या जात मुचकल्यावर सुटका होत तो बाहरे येऊन तो पुन्हा एकदा पसारही झाला आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.


- Advertisement -

हेही वाचा- ‘गरज सरो, पटेल मरो’ स्टेडियमच्या नामांतरावरुन भाजपवर शिवसेनेची टीका

- Advertisement -