घरमहाराष्ट्रबेहिशेबी मालमत्ता प्रकरण: चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

Subscribe

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात पती अडकण्याची शक्यता

पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भाजपा नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. मात्र संजय राठोड यांच्याविरोधातील आक्रमकपणा चित्रा वाघ यांच्यासमोर अडचणी निर्माण करण्याची शक्यता आहे. कारण बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता पोलीसही तपास करत आहेत. याप्रकरणात चित्रा वाघ पुन्हा गोत्यात येण्याची शक्यता आहे. (ACB files case against Chitra Wagh’s husband Kishor Wagh)

चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांना २०१६ मध्ये ४ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सध्या सुरु आहे. याच तपासादरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आता गुन्हा दाखल केला आहे. परळच्या महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयाशी संबंधित हे प्रकरण असून किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी त्यांच्या पतीची चौकशी होणार होती. या चौकशीच्या फेऱ्यापासून वाचण्यासाठी पती चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपा प्रवेश केला. परंतु हे प्रकरण आता पुन्हा उफाळून आले आहे. चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्या विविध शहरात असलेल्या मालमत्तांपैकी ९० टक्के मालमत्ता ही बेहिशेबी मालमत्ता असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे एक कोटींहून अधिकची बेहिशोबी मालमत्ता असल्याचा दावा केला जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, या कारवाईवरून भाजपाने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय सुडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप चित्रा वाघ यांनी केला आहे. पतीविरोधात एफआयआर दाखल झाल्याचे कळवण्यात आले नाही. असे चित्रा वाघ म्हणाल्या


हेही वाचा- मराठी भाषा दिन: राज ठाकरे म्हणतात…दीदी मी खरंच तुमचा ऋणी आहे

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -