लातूर : किल्लारी भूकंपाला आज 30 वर्ष पूर्ण झाली होती. यानिमित्ताने कृतज्ञता सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी जुन्या आठवणी जाग्या केल्या. या कार्यक्रमादरम्यान शरद पवार चप्पल घालत होते. पण आपल्या वडिलांना चप्पल घालताना होणारा त्रास मुलगी सुप्रिया सुळेच्या लक्षात आल्यानंतर त्या थेट खाली बसल्या आणि स्वत:च्या हाताने पायात चप्पल घालण्यास मदत केली. हा बालकेलीच्या नात्याचा प्रेम दाखवणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
शरद पवार हे 82 वर्षाचे आहेत. या वयात देखील शरद पवार हे जनतेसाठी आजही राजकारणात सक्रिय आहे. शरद पवारांचे वय झाल्यामुळे त्यांना आरोग्याच्या काही अडचणींचा सामना करावा लागतो. शरद पवार हे आज लातूरमध्ये कार्यक्रमासाठी गेले असताना शरद पवार आले असताना त्यांना चप्पल घालण्यासाठी लेक सुप्रिया सुळेंनी जमिनीवर बसून मदत केली. हा व्हिडीओ व्हायरल होत असून सुप्रिया सुळेंचे वडिलांवरच्या प्रेमाचे कौतुक होत आहे.
हेही वाचा – राहुल गांधींनी बांधली सोनिया गांधींच्या बुटाची लेस अन् अनेकांना आठवण झाली ‘त्या’ प्रसंगाची
भारताच्या गानकोकिळा लता मंगेशकर यांचं निधन झालं त्यावेळी शिवाजी पार्क मैदानावर विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थितांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेसुद्धा उपस्थित होते. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतल्यानंतर शरद पवार खुर्चीवर येऊन बसले. तेव्हा ते बूट घालण्यासाठी खाली वाकत होते. आपल्या वडिलांना खाली वाकून बूट घालण्यासाठी त्रास होईल म्हणून सुप्रिया सुळे पुढे आल्या आणि त्यांनी खाली बसून वडिलांच्या पायात बूट घातले. हेच क्षण कॅमेरामध्येही टिपले गेले. वडील मुलीच्या नात्याचं अनेकांनी कौतुक केलं. आज राहुल गांधी यांनी त्यांच्या आईच्या बुटाची लेस बांधताना शरद पवार सुप्रिया सुळे यांच्याही भावुक प्रसंगाची आठवण अनेकांना झाली.
हेही वाचा – किल्लारी भूकंप 30 कटू वर्षे : पुनर्वसनासाठी मनमोहनसिंगांनी दहा दिवसांत दिले कोट्यवधी रुपये- शरद पवार