घरदेश-विदेशDay at Sea : महाराष्ट्रातील 25 आमदारांनी अनुभवला भरसमुद्रात नौदलाचा थरार

Day at Sea : महाराष्ट्रातील 25 आमदारांनी अनुभवला भरसमुद्रात नौदलाचा थरार

Subscribe

मुंबई : भारतीय नौदलातर्फे महाराष्ट्रातील विधानसभ आणि विधान परिषद सदस्यांसाठी गुरुवारी ‘एक दिवस समुद्रावर’ (Day at Sea) या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाअंतर्गत पश्चिम नौदल कमांडने विविध थरारक प्रात्यक्षिके सादर केली. समाजातील सर्व घटकांमध्ये, विशेषतः किनारपट्टीवरच्या राज्यांमध्ये समुद्राविषयी अधिकाधिक जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

‘एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमात 25 आमदारांसह 125 पाहुणे आणि अधिकाऱ्यांनी पश्चिम ताफ्यातील आयएनएस चेन्नई, आयएनएस विशाखापट्टणम आणि आयएनएस तेग या आघाडीच्या युद्धनौकांवरून नौसेनेच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती घेतली. भारतीय नौदलाचे दैनंदिन कार्य आणि नौदल जवानांचे युद्धनौकांवरील जीवन पाहण्याची चांगली संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वांना मिळाली.

- Advertisement -

फास्ट अटॅक क्राफ्टद्वारे सिम्युलेटेड हल्ला, हवाई सामर्थ्याचे प्रात्यक्षिक, चेतक हेलिकॉप्टरद्वारे शोध आणि बचाव कार्य, सी किंग हेलिकॉप्टरद्वारे सोनार डंक ऑपरेशन, एका युद्धनौकेवरून दुसऱ्या युद्धनौकेवर जवानांचे किंवा युद्धसाहित्याचे स्थलांतर यासारखी सर्व प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. समुद्रातील नौदलाच्या सर्व पैलूंबद्दल मान्यवरांना माहिती देण्यासाठी पाणबुडीचे प्रात्यक्षिकही आयोजित करण्यात आले होते.

- Advertisement -

विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अन्य मान्यवरांनी युद्धनौकेवरून या प्रात्यक्षिकांची पाहणी केली. कमांडच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थित सर्व मान्यवरांशी संवाद साधला आणि सागरी क्षेत्रात देशाला भेडसावणाऱ्या धोक्यांसंदर्भात आणि आव्हानांवर मात करण्यावर भर देऊन भारतीय नौदलाने हाती घेतलेल्या मोहिमांची माहिती दिली. राष्ट्रीय सुरक्षा आणि देश उभारणीत नौदलाची महत्त्वाची भूमिका तसेच समुद्रातील खडतर जीवन आणि आव्हाने याबद्दल विधिमंडळ सदस्य आणि सरकारी अधिकार्‍यांना अवगत करणे हा ‘एक दिवस समुद्रावर’ या कार्यक्रमाचा उद्देश होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -