घरमहाराष्ट्ररेवदंड्यात मद्यपींसह अल्पवयीन वाहनचालकांकडून दंड वसूल

रेवदंड्यात मद्यपींसह अल्पवयीन वाहनचालकांकडून दंड वसूल

Subscribe

येथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वावे, साळाव तपासणी नाका, पारनाका येथे निरीक्षक सुनील जैतापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली वाहन तपासणी दरम्यान मद्यपी आणि अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात येऊन 9 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

मद्यपान करून वाहने चालविणार्‍या चालकांचे प्रमाण कमी व्हावे आणि पर्यायाने अपघातांना आळा बसावा म्हणून ही मोहीम हाती घेण्यात आली. या मार्गावर पर्यटकांच्या वाहनांसह अन्य प्रवासी, तसे माल वाहतूक करणार्‍या वाहनांची मोठी वर्दळ असते. अनेकदा महामार्गावरील ढाब्यावर प्रवासी वाहन थांबवून चालक मद्यपान करण्याची शक्यता असते. त्यामुळे अपघाताचा धोका लक्षात घेऊन मुरुड तालुक्यातील साळाव आणि अलिबाग-रोहे राज्य मार्गावरील वावे तपासणी नाक्यावर तपासणी मोहीम हाती घेतली होती. या मार्गावरून जाणार्‍या सर्वच वाहनांच्या चालकांची तपासणी करण्यात आली.

- Advertisement -

या मोहिमेत हवालदार विजयकुमार तांबे, पोलीस नाईक केदार साखरकर, सहाय्यक फौजदार रमण महाले आणि सरके, खाडे यांनी भाग घेऊन ४१ प्रकरणांत उपरोक्त दंड वसूल केला. दरम्यान, मद्यपान करून वाहन चालविणे, तसेच अल्पवयीन मुलामुलींनी वाहन चालविणे धोकादायक असल्याने ही मोहीम हाती घेण्यात आली असून, पुढे ती चालूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती जैतापूरकर यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -