घरCORONA UPDATEराज्यात आता बेरोजगारांना एका क्लिकवर मिळणार रोजगाराची संधी

राज्यात आता बेरोजगारांना एका क्लिकवर मिळणार रोजगाराची संधी

Subscribe

कौशल्य विकास विभागाच्या महास्वंय या वेबसाईटवर क्लीक केल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची महाव्दारे खुली होण्याची शक्यता आहे.

मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये बेरोजगारीचे संकट दिसू लागले आहे. मात्र आता लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे राज्यातील उद्योग व्यवसायांचे चक्र पुन्हा सुरु झाले आहे. त्याचबरोबर आता वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधीही बेरोजगार तरुण-तरुणींना निर्माण होणार आहे. कौशल्य विकास विभागाच्या महास्वंय या वेबसाईटवर क्लीक केल्यावर वेगवेगळ्या क्षेत्रातील रोजगाराच्या संधींची महाव्दारे खुली होण्याची शक्यता आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच उद्योग व्यवसायांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी  राज्याच्या कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरु आहे. या वेबसाईटच्या माध्यमातून उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल मनुष्यबळामध्ये समन्वय साधून दोघांनाही उपयोगी ठरणारे माध्यम तयार करण्यात आले आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री  नवाब मलिक यांनी दिली.

शैक्षणिक नोंदणी आवश्यक 

दरम्यान बेरोजगार तरुणांसाठी या संकेतस्थळावर विविध सुविधा उपलब्ध आहेत. यासाठी त्यांनी संकेतस्थळावर त्यांच्या शैक्षणिक आणि इतर माहितीसह नोंदणी करणे आवश्यक आहे. या माहितीच्या आधारे आवश्यकतेनुसार एखाद्या उद्योग अथवा आस्थापनेकडून त्यांना जॉब ऑफर मिळू शकते. याशिवाय नोकरी साधक (नोकरी शोध) याठिकाणी क्लिक केल्यावर रोजगार यादी, क्षेत्र, स्थान व शिक्षणानूसार रोजगार संधींची माहिती मिळते. विविध माध्यमांमध्ये प्रसिध्द होणाऱ्या रिक्त पदांच्या जाहिराती पाहण्यासाठी “रिक्तपदांच्या जाहिराती” या टॅबव्‍दारे माहिती मिळू शकते. या वेबसाईटवर उद्योजकांसाठीही विविध सुविधा उपलब्ध आहेत. नोंदणी केलेल्या उमेदवारांची माहिती, त्यांचे शिक्षण, कौशल्य, अनुभव, हा तपशील उपलब्ध आहेच त्याशिवाय उद्योजक म्हणून नोंदणी करणे, नवीन प्लांट, शाखेची स्वतंत्र नोंद करणे, वेळोवेळी निर्माण होणारी रिक्‍तपदे मुलाखती, प्राथमिकरित्या निवडलेल्या उमेदवारांना  विनामुल्य एसएमएस पाठविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

www.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर रोजगार विषयक सर्व सेवा  उद्योजक आणि उमेदवार या दोघांनाही विनामुल्य उपलब्ध आहेत. याबाबत काही अडचणी असल्यास जिल्ह्यातील सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्याशी संपर्क साधावा. – नवाब मलिक, कौशल्य विकास मंत्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -