घरदेश-विदेशदेशात बेरोजगारी वाढली; ‘या’ अहवालातून माहिती आली समोर

देशात बेरोजगारी वाढली; ‘या’ अहवालातून माहिती आली समोर

Subscribe

मुंबई : नुकतेच रोजगार मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्ती पत्राचे वापट करण्यात आले. पण देशात 2023मध्ये नव्या नोकऱ्यांचे प्रमाण घटले असून देशात बेरोजगारांच्या संख्येत वाढ झालेल्याची धक्कादायक एका अहवालातून समोर आली आहे. देशातील नोकरदारांच्या पगारात घट झाल्याचे माहिती अहवालातून मिळाली आहे. यामुळे देशात तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे मोदी सरकारचे सर्व दावे खोटे असल्याचे स्पष्ट होत आहे.

यंदा नव्या नोकऱ्यांचे प्रमाण तब्बल 17.5 टक्क्यांनी घटले आहे. यामुळे 6.6 दशलक्ष ऐवढ्या नव्या नोकऱ्या निर्माण असल्याचे ‘फ्रंटलाइन वर्कफोर्स मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म बेटरप्लेस’ने तयार केलेल्या अहवालातील आकडेवारी मिळाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात 8.8 दशलक्ष नव्या होत्या. यामुळे देशात बेरोजागारांची संख्या वाढलेली आहे. यात लॉजिस्टीक, मोबिलीटी आणि ई-कॉमर्स या क्षेत्राची आकडेवारी बेटरप्लेसकडे आली. बेरोजगारीचे आकडेवारीचे दर्शविणारा अहवाल सोमवारी प्रसिद्ध झाला आहे. नुकतेच देशात 25 वर्षांखाली तरुण पदवीधरांपैकी 42 टक्के बेरोजगार असल्याचा अहवाल अझीझ पेरमजी विद्यापीठाच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2022 मध्ये असलेल्या 22,800 रुपये पगारात 2023मध्ये 21,700 पर्यंत घट झाल्याचे देखील अहवालात म्हटले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; अनंत चतुर्थी ते गांधी जयंतीपर्यंत सलग सुट्या

नोकऱ्या घटल्या

- Advertisement -

मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, साफसफाई, बिझनेस डेव्हलपमेंट एक्झिक्युटिव्ह, सेल्स आणि इतर नोकऱ्यांवर परिणाम झाला आहे. तसेच अमेरिकेतील मंदीचा फटका हा आयटी क्षेत्राला बसला आहे. ई-कॉमर्सच्या मागणीतही 52 टक्क्यांनी घट झाल्याचे दिसून आले, असे बेटरप्लेसच्या अहवालातून माहिती मिळाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -