Homeमहाराष्ट्रUnemployment : त्या व्हिडीओने केली मोदी-फडणवीस सरकाराच्या दाव्यांची पोलखोल, ठाकरेंचा घणाघात

Unemployment : त्या व्हिडीओने केली मोदी-फडणवीस सरकाराच्या दाव्यांची पोलखोल, ठाकरेंचा घणाघात

Subscribe

वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याच्या वल्गना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केल्या. मात्र त्याच्या चिंधड्याच पुण्यातील या व्हिडीओने उडविल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दावोस पुराणा’तील वांगीही या व्हिडीओने सडकी ठरविली, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

(Unemployment) मुंबई : स्वित्झर्लंडमधील दावोस येथे झालेल्या जागतिक परिषदेचा हवाला देत महाराष्ट्रात येऊ घातलेली काही लाख कोटींची परकीय गुंतवणूक आणि त्यातून होणारी हजारोंची रोजगार निर्मिती याचे डमरूदेखील मुख्यमंत्री आणि त्यांच्या चेल्यांनी अलीकडेच वाजवले. मात्र, महाराष्ट्रातील बेरोजगारीचे वास्तव काय आहे? पुण्यातील एका ‘व्हिडीओ’ने हे जळजळीत वास्तव समोर आणले आहे आणि राज्यकर्त्यांचा खोटारडेपणाही उघड केला आहे. दोन दिवसांपूर्वीच्या या व्हिडीओने मोदी आणि फडणवीस सरकारच्या सर्वच दाव्यांची पोलखोल केली, अशी घणाघाती टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Thackeray targets Fadnavis regarding Pune video)

केंद्रातील राज्यकर्ते देशाच्या तथाकथित विकासाचे ‘प्रगती पुस्तक’ येता-जाता जनतेसमोर फडकवत असतात. महाराष्ट्रातील त्यांचे वारसदारदेखील त्यांच्याप्रमाणेच ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही’ वगैरे नारेबाजी करीत असतात, असा टोला सामना दैनिकातील अग्रलेखाच्या माध्यमातून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

हेही वाचा – Mahakumbh Stampede : अफवांकडे लक्ष देऊ नका, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीनंतर मुख्यमंत्री योगींचे आवाहन

पुण्यातील एका आयटी कंपनीने 100 जागांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ची जाहिरात दिली. मात्र त्यासाठी तब्बल तीन – चार हजारांवर तरुण आयटी इंजिनीअर्सची रांग लागली. भर उन्हात हे तरुण-तरुणी नोकरीच्या आशेने तासन्तास उभे असलेले महाराष्ट्राने, देशाने आणि जगानेही पाहिले. विद्येचे माहेरघर अशी कधीकाळी ओळख असलेल्या पुण्याची नवीन ओळख ‘आयटी हब’ अशी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या कानाकोपऱ्यातून येथे तरुण-तरुणी नोकरीच्या आशेने येत असतात. मात्र या व्हिडीओने पुण्यात नोकऱ्यांची कशी वानवा आहे, सरकारचे सर्व दावे कसे पोकळ आहेत हेच दाखवून दिले, असे या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे.

वर्षाला दोन कोटी रोजगार देण्याच्या वल्गना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने केल्या. मात्र त्याच्या चिंधड्याच पुण्यातील या व्हिडीओने उडविल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘दावोस पुराणा’तील वांगीही या व्हिडीओने सडकी ठरविली, अशी बोचरी टीका ठाकरे यांनी केली आहे. (Unemployment: Thackeray targets Fadnavis regarding Pune video)

हेही वाचा – Aaditya Thackeray : वरळीकरांच्या नागरी समस्या सोडविण्यासाठी आदित्य ठाकरे पालिकेच्या दारी