घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपोलिसांची अक्षम्य बेपर्वाई : पीडित मुलगी तक्रारीअभावी उपाशीपोटी परतली घरी

पोलिसांची अक्षम्य बेपर्वाई : पीडित मुलगी तक्रारीअभावी उपाशीपोटी परतली घरी

Subscribe

पंचवटी : बहुचर्चित ज्ञानपीठ गुरुकुल आधार आश्रमाच्या अध्यक्षानेच सहा मुलींचे लैंगिक शोषण केल्याची गंभीर घटना उघडकीस आली असताना आता म्हसरूळ पोलिसांची अक्षम्य बेपर्वाई दिसून आली. सातव्या पीडित मुलीने सोमवारी (दि.२८) म्हसरूळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने तिला दिवसभर उपाशीपोटी राहून निराशेपोटी घरी परतावे लागले.

ज्ञानदीप आधार आश्रमात वास्तव्यास असणारी एक पीडित मुलगी स्वतःहून सोमवारी (दि.२८) दुपारी १ वाजेच्या सुमारास म्हसरूळ पोलीस ठाण्यात आली. तिने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक साखरे यांची भेट घेतली असता त्यांनी तिला लैंगिक शोषणप्रकरणात आत्तापर्यंत सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुमचाही गुन्हा नोंदवून घेतला जाईल, त्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना भेटा, असे सांगितले. त्यावेळी वरिष्ठांशी संपर्क केला असता गुन्हा नोंदवा सांगितले. मात्र, पीडित मुलीला दिवसभर फिर्याद देण्यासाठी उपाशीपोटी पोलीस ठाण्याच्या आवारात बसावे लागले. पोलिसांनी फिर्याद न घेतल्याने तिला निराशेपोटी घरी परतावे लागले, असे आदिम संघर्ष समन्वय समितीने पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

- Advertisement -
आदिम संघर्ष समितीही आक्रमक

आश्रमात शिकत असलेल्या मुलींप्रमाणेच मुलांची देखील चौकशी पोलिसांनी करावी. तपासी अधिकार्‍यांनी साथीदारासह आर्थिक व्यवहाराची तपासवी करावी. याच आश्रमात वास्तव्यास असणारी एक पीडित मुलगी सोमवारी (दि.२८) म्हसरूळ पोलीस ठाण्यात आली. मात्र, तिची दखल घेण्यात आली नाही. माने नगर आणि कोणार्क नगरमध्ये संशयित मोरे आणि घरमालक यांनी पोलीस ठाण्यात भाडेकरू नोंद केलेली नाही. त्यामुळे पोलिसांनी काही वर्षांपूर्वी शहरात भाडेकरू नोंद न करणार्‍यांवर गुन्हे दाखल केल्याच्या घटना असताना या प्रकरणात अजूनही घरमालकांवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे निवेदनात म्हटले आहे. याप्रसंगी नवनाथ ह्युमन, योगेश रिंझड, प्रभाकर फसाळे, विकी मुंजे, मनिषा घंगाळे व पृथ्वीराज अंडे उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -