ह्रदयद्रावक! सोलापुरात पुलावरून कोसळून एकाचवेळी 11 काळविटांचा मृत्यू

unfortunate death of 11 blackbucks after falling from flyover near solapur

सोलापूर – विजयपूर महामार्गावरील केगाव बायपास रस्तावर रस्ता ओलांडताना पुलावरून 14 काळवीट खाली कोसळली. यातील 11 काळवीटांचा जागीच मृत्यू झाला आहे. 35 फूट उंचीवरून ही सर्व काळवीट खाली कोसळली, यातील तीन काळवीट गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर पशुवैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सोलापूर शहरालगतच्या शिवाजी नगर परिसरात हिरजच्या माळरानावरून 14 काळवीटांचा कळप येत होता. यावेळी माघून येणाऱ्या वाहनाला आणि कुत्र्याला घाबरून या कळपाने उड्डाण पुलावरून खाली उडी मारली, यात अनेक कळवीट जागीच दगावली, शनिवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास ही घटना घडली आहे. अनेकदा या मार्गावर हरणांचा देखील मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी तात्काळ वन विभागाला सदर घटनेची माहिती देताच उपवनसंरभक धैर्यशिल पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली, यानंतर जखमी काळवीटांना तातडीने उपचारांसाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातामुळे पुन्हा एकदा वन्यजीवांच्या या दुर्दैवी मृत्यूसाठी कोणाला जबाबदार धरणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

याठिकाणी वन्यजीवांचा अधिक आहे. मात्र तरी देखील याठिकाणाहून जाणाऱ्या महामार्गांवर डोंगर फोडून रस्ता आणि पुल तयार केला आहे. यामुळे वारंवार याठिकाणी वन्यजीवांच्या अपघाताच्या घटना घडत आहे.