घरमहाराष्ट्रदुर्दैव! २ वर्षात २४ हजार मुलांच्या आत्महत्या

दुर्दैव! २ वर्षात २४ हजार मुलांच्या आत्महत्या

Subscribe

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने संसदेत दिलेल्या माहितीनुसार आकडेवारी गंभीर

२०१७ ते २०१९ या दोन वर्षात २४ हजारांपेक्षा जास्त मुलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यामध्ये १४-१८ वयोगटातील मुलांचा समावेश आहे. तर, या २४ हजारांपैकी ४ हजारांपेक्षा जास्त मुलांनी फक्त परीक्षेत अपयश आल्यामुळे आत्महत्या केली आहे.

२०१७-१९ दरम्यान आत्महत्या केलेल्या मुलांमध्ये १४-१८ वयोगटातील १३,३२५ मुली तर उर्वरित मुले आहेत. २०१७ मध्ये १७-१८ वयोगटातील ८,०२९ मुलांनी आत्महत्या केली. त्यानंतर २०१८ ही संख्या वाढून ८,१६२ आणि 2019 मध्ये ८,३७७ झाली. दरम्यान, या मुलांमध्ये सर्वाधिक ३,११५ मुले मध्य प्रदेशातील आहेत. त्यानंतर पश्चिम बंगाल २८०२, महाराष्ट्र २५२७ आणि तमिळनाडूचा २,०३५ मुलांचा समावेश आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -