केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार महाराष्ट्र दौरा?, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखणार रणनिती

Union Home Minister Amit Shah to visit Maharashtra for upcoming election
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह करणार महाराष्ट्र दौरा?, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आखणार रणनिती

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. यापूर्वी अमित शाह पुण्याच्या दौऱ्यावर होते. दौऱ्यादरम्यान शाह यांनी महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चांगलाच निशाणा साधला होता. आता राज्यातील महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीची सांगता करण्यासाठी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना बोलवण्यात येणार आहे.

भाजपकडून राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ही बैठक झाली नव्हती. परंतु आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक फार महत्त्वाची मानली जात आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बैठक आयोजित करण्यात येत होती. परंतु यादरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना येणे शक्य होत नसल्यामुळे आता कार्यक्रम पुढे ढकलण्यात येत आहे.

भाजपच्या कार्यकारिणी बैठकीला केंद्रीय मंत्री अमित शाह यांना येणे शक्य नाही. यामुळे बैठक पंधरा दिवस पुढे ढकलण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. भाजपकडून २८ आणि २९ मे २०२२ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. परंतु आता नव्या वेळेनुसार जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात ही बैठक होणार आहे. यापूर्वी २००५ रोजी औरंगाबादेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी त्यावेळी हजेरी लावली होती. आता औरंगाबादमध्येच ही बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे निवडणुकांचा कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाऊ शकतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून रणनिती आखत आहेत. राज्य निवडणूक आयोगाला ४ मे रोजी २ आठवड्यांत निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. तसेच या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात याव्यात असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.


हेही वाचा : धर्मवीर चित्रपटाचा शेवट मुख्यमंत्र्यांनी टाळला, म्हणाले आनंद दिघेंचा मृत्यू…