घरताज्या घडामोडीकेंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुढील आठवड्यात नाशिक दौऱ्यावर

Subscribe

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) पुढील आठवड्यात नाशिक (Nashik) दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळते. या नाशिक दौऱ्यात अमित शहा यांच्या हस्ते अनेक उपक्रमांचे उद्धाटन होणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) पुढील आठवड्यात नाशिक (Nashik) दौऱ्यावर येत असल्याची माहिती मिळते. या नाशिक दौऱ्यात अमित शहा यांच्या हस्ते अनेक उपक्रमांचे उद्धाटन होणार असून, त्र्यंबकेश्वर (Trambakeshwar) तीर्थस्थळी भेट देणार असल्याचेही बोलले जात आहे. दरम्यान, अमित शहा यांचा हा दौरा अगामी निवडणुकीच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. (union home minister amit shah will visit to nashik in next week)

केंद्रीय सुरक्षा यंत्रणा

- Advertisement -

गृहमंत्री अमित शहा मागील अनेक दिवसांपासून राज्याचा दौरा करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहांचा नाशिक दौरा विशेष असून त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या गुरुपीठ भेट देणार आहेत. दरम्यान, अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा (Central security system) तसेच स्थानिक सरकारी यंत्रणांनी गुरुपीठ कार्यक्रमस्थळी भेट देऊन आढावा घेतला.

एप्रिल महिन्यात स्वामीसेवा मार्गाच्या वतीने चंद्रकांत मोरे आणि डॉ. दिगपाल गिरासे यांनी दिल्ली जाऊन गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवामार्ग सुमारे १० हजार केंद्राच्या माध्यमातून अध्यात्मिक, सामाजिक आणि राष्ट्रीय कार्य करत आहेत. या कार्याबाबत त्यांना माहिती दिली. तसेच, समर्थ गुरुपीठास भेट देण्याची विनंती केली.

- Advertisement -

त्यांच्या या विनंतीनंतर अमित शहा हे जागतिक योग दिनी त्र्यंबकेश्वर नगरीत समर्थ गुरुपीठावर येत आहेत. दरम्यान, जागतिक योग दिन आणि सदगुरु मोरेदादा हॉस्पिटल शिलान्यास सोहळ्यास अमी शहा उपस्थित राहणार आहेत. शिवाय, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेतेही उपस्थित राहणार आहेत. दरम्यान या कार्यक्रमाच्या सुरक्षाविषयक तयारीचा आढावा विविध यंत्रणांकडून घेतला जात आहे.


हेही वाचा – विविध क्षेत्रातून महाराष्ट्राने देशाला प्रेरित केलं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -