घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रउत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गौरव; पोलीस अधीक्षक सुनील कडासनेंसह ११ अधिकार्‍यांना युनियन...

उत्कृष्ट तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गौरव; पोलीस अधीक्षक सुनील कडासनेंसह ११ अधिकार्‍यांना युनियन होम मिनिस्टर पदक

Subscribe

किचकट आणि गंभीर गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून त्याचा छडा लावणार्‍या देशभरातील १५२ पोलीस अधिकार्‍यांना गुरुवारी (दि.१२) केंद्रीय गृहमंत्रालयाने युनियन होम मिनिस्टर पदक जाहीर केले आहेत. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील 1१ पोलीस अधिकार्‍यांचा समावेश असून, त्यात चार महिला पोलीस अधिकारी आहेत. कडासने यांनी श्रीरामपूर येथे अतिरिक्त पोलीस अधीक्षक असताना केलेल्या दुहेरी खूनाच्या तपासासाठी हे पदक देण्यात आले आहे.

पोलिसांमध्ये तपास कार्याबद्दल उच्च व्यावसायिक दृष्टिकोन निर्माण व्हावा. उत्तम तपास कार्य करणार्‍या पोलिसांच्या कार्याची घेतली जावी, या हेतून २०१८ साली केंद्र सरकारने हे पुरस्कार सुरु केले. ही पारितोषिके मिळवणार्‍या कर्मचार्‍यांमध्ये केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या १५ जणांचा समोश आहे. तसेच, महाराष्ट्र पोलीस दलातील ११, गोवा पोलीस दलातील एक आणि गुजरातच्या पोलीस दलातील सहा अधिकार्‍यांना हे पदक मिळाले आहे. यामध्ये मध्यप्रदेश ११, उत्तरप्रदेश १०, केरळ आणि राजस्थानातील प्रत्येकी ९, तामिळनाडू पोलीस दलातील ८ आणि बिहाराचे ७, कर्नाटक आणि दिल्ली पोलीस दलातील प्रत्येकी ६ आणि इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील पदकप्राप्त पोलीस अधिकार्‍यांचा समावेश आहे. यामध्ये २८ महिला पोलीस अधिकारी आहेत.

- Advertisement -

महाराष्ट्रातील पदकप्राप्त अधिकारी

पोलीस अधीक्षक सुनील कडासने, पोलीस निरीक्षक ममता लॉरेन्स डिसोझा, सहायक पोलीस आयुक्त पद्मजा अमोल बधे, सहायक पोलीस निरीक्षक अलका धीरज जाधव, सहायक पोलीस आयुक्त प्रिती प्रकाश टिपरे, सहायक पोलीस निरीक्षक राहुल धलसिंग बहूरे, पोलीस निरीक्षक मनोहर नरसप्पा पाटील, उपअधीक्षक अजित राजाराम टिके, पोलीस निरीक्षक सुनील शंकर शिंदे, उपअधीक्षक उमेश शंकर माने-पाटील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -