घरताज्या घडामोडीलोकप्रिय कामगार नेते र.ग. कर्णिक यांचं निधन

लोकप्रिय कामगार नेते र.ग. कर्णिक यांचं निधन

Subscribe

अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे मानद अध्यक्ष, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्राचे माजी सरचिटणीस र.ग.कर्णिक यांचे आज वृध्दोपकाळाने आज निधन झाले. त्यांनी वयाच्या ९१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. माहितीनुसार कर्णिक यांची अंत्ययात्रा दुपारी ४ वाजता त्यांच्या बांद्रा (प) येथील राहत्या घरी येथून निघणार आहे.

र.ग.कर्णिक यांनी सलग ५० वर्षे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे समर्थपणे नेतृत्व करुन सन्मानपूर्वक सेवा शर्ती आणि वेतनाचे लाभ मिळवून दिले. त्यांच्या नेतृत्वाखाली ५४ दिवसांचा संप हा कामगार/कर्मचारी चळवळीतील मैलाचा दगड आहे.
र.ग. यांचं पूर्ण नाव रमाकांत गणेश कर्णिक असं आहे. त्यांचा जन्म २७ जानेवारी १९३० रोजी झाला. मंत्रालयीन कर्मचारी संघटना कर्णिक यांनी १९५६ साली प्रथम बांधली. राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे महाराष्ट्राचे १९६२ पासून स्थापना आणि नेतृत्व केले ते २०१४ पर्यंत संघटनेचे विद्यमान संस्थापक सल्लागार होते.

- Advertisement -

१९९१ पासून खाजगीकरण आणि कंत्राटीकरण विरोधात लढा उभारला. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अनेक वर्षे देशपातळीवर नेतृत्व त्यांनी केलं. ११ ऑगस्ट १९६६ साली नौमित्तिक रजा आंदोलन केलं. कॉ. डांगे प्रतिष्ठानचे विश्वस्त व अध्यक्ष होते, शिवाय ते संयुक्त कामगार-कर्मचारी कृती समितीचे चेअरमन होते. देश स्तरावरही राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे समर्थ नेतृत्व कर्णिक यांनी केले.


हेही वाचा – यंदाचा जनस्थान पुरस्कार मधु मंगेश कर्णिक यांना जाहीर

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -