घरमहाराष्ट्रराज्याला ड्रायव्हर नकोय तर लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवाय; राणेंची बोचरी टीका

राज्याला ड्रायव्हर नकोय तर लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवाय; राणेंची बोचरी टीका

Subscribe

केंद्रीय सूक्ष्म,लघू आणि मध्यम उपक्रम मंत्री नारायण राणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे. राज्याला ड्रायव्हर नकोय तर लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवाय, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे. नारायण राणे यांनी कोकणातील पूरस्थिती हातळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याची टीका देखील केली. ते माध्यमांशी बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विठ्ठलाच्या दर्शानाला स्वत: गाडी चालवत गेले. यावरुन कौतुक होत आहे. मात्र, यावरुन नारायण राणे यांनी टीकास्त्र डागलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री गाडी चालवत विठ्ठल दर्शनला गेले. पण चेंबूर आणि भांडूपला मृत पावलेल्या कुटुंबियांचं सांत्वन करायला गेले नाहीत. पंढरपूरला जाणं त्यांना महत्त्वाचं वाटतं, असं नारायण राणे म्हणाले. ‘राज्याला ड्रायव्हर नको आहे, महाराष्ट्र शासनाकडे हजारो ड्रायव्हर आहेत, राज्याला लोकांचं हित पाहणारा मुख्यमंत्री हवाय’ अशी बोचरी टीका देखील नारायण राणे यांनी केली. ‘कॅबिनेटला जायचं नाही, मंत्रालयात जायचं नाही आणि गाडी चालवत जायचं, यात कर्तृत्व कुठे आहे. आज जनतेचा जीव धोक्यात असताना, त्यांना वाचवायचं सोडून, ज्यांच्या घरातील माणसं गेली, त्यांचं सांत्वन करायचं सोडून हे गाडी चालवत गेले, अशा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र डागलं.

- Advertisement -

राज्य सरकारला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही

राज्यातील अतिवृष्टीवरुन नारायण राणे यांनी राज्य सरकारवर देखील टीका केली. राज्य सरकारला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नसल्याची टीका राणेंनी केली. कोकणात अतिवृष्टी झाली, लोकांचा जीव धोक्यात आला आहे, त्यांच्यासाठी तरतुद करुन ठेवायला हवी होती, याची माहिती नव्हती का? आजच पाऊस पडला का? असा सवाल नारायण राणे यांनी केला. राज्याच्या मुख्यमंत्र्याना माणुसकी आहे का? अशी खरमरीत टीका नारायण राणे यांनी केली.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -