Narayan Rane: केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन मंजूर, न्यायालयाकडून मोठा दिलासा

केंद्रीय नारायण राणे यांना धुळे व सत्र न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. महाड येथील एका पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी धुळे न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे न्यायालयाकडून राणेंना मोठा दिलासा मिळाला आहे.

नारायण राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांकडून धुळ्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दाखल गुन्ह्यासंदर्भात नारायण राणे यांचे वकील अॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांच्याकडून धुळे सत्र न्यायालयात ४ मे रोजी अटक पूर्व जामीन प्रकरण दाखल करण्यात आला होता. त्याप्रकरणी न्यायाधीश आर.एच मोहम्मद यांनी राणेंचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

आजच्या सुनावणीबाबत माहिती देताना अ‍ॅड. अनिकेत उज्ज्वल निकम यांनी सांगितले की, नारायण राणे यांच्या विरुद्ध लावण्यात आलेली कलमं सकृतदर्शनी चुकीची आणि बेकायदेशीर आहेत, असे आम्ही न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सत्र न्यायाधीश आर.एच.मोहम्मद यांनी दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्यानंतर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या डोक्यावर असलेली अटकेची टांगती तलवार आता बाजूला झालेली आहे.


हेही वाचा : Share Market : शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्समध्ये ०.३५ टक्क्यांची घसरण