Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी उद्धव ठाकरे खोटारडे अन् लबाड लांडगा; नारायण राणेंचे जोरदार टीकास्त्र

उद्धव ठाकरे खोटारडे अन् लबाड लांडगा; नारायण राणेंचे जोरदार टीकास्त्र

Subscribe

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे हे पहिले मंत्र्यांची बैठक घेत होते. त्यानंतर खासदार, आमदार आणि आता गटनेत्यांची बैठक घेत आहेत. उद्धव ठाकरे आता गटनेत्यांच्या बैठकीपर्यंत पोहोचले आहेत. त्यावेळी या बैठकीत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली. त्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “यांच्या एवढा खोटारडा माणूस मी पाहिला नाही, सतत खोटं बोलत राहतात, युती असताना अमित शाहांना फोन करत होते. उद्धव ठाकरे हे जगातले ढ माणूस आहेत”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले. (Union minister Narayan Rane Slams Shiv sena chief Uddhav Thackeray)

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची दिल्लीत पत्रकार परिषद झाली. त्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. “उद्धव ठाकरे हे पहिले मंत्र्यांची बैठक घेत होते. त्यानंतर खासदार, आमदार आणि आता गटनेत्यांची बैठक घेत आहेत. उद्धव ठाकरे आता गटनेत्यांच्या बैठकीपर्यंत पोहोचले आहेत. त्यावेळी या बैठकीत त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली. गटनेता हा ठाराविक विभागाचा प्रमुख असतो आणि त्यांच्यासमोर केंद्र सरकार आणि अमित शाहा यांच्याबद्दल उद्धव ठाकरे काय बोलले, त्यावेळी त्यांचे भाषण बघता नैराश्येतून भाषण केल्यासारखे वाटले. मुख्यमंत्रीपद गेले म्हणून भाषण केले”, असे नारायण राणे यांनी म्हटले.

- Advertisement -

“मेळाव्यात एक खुर्ची खाली होती, संजय राऊत असे नाव लिहिले होते. संजय राऊत हे जेलमध्ये असताना सभेला त्यांची खुर्ची ठेवण्यात आली. त्यांच्याबद्दलही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे यांना अमित शहा यांचा दौरा एवढा का झोंबला, अमित शाहा हे देशाचे गृहमंत्री ते देशभरात कुठेही जाऊ शकतात, उद्या महापालिका निवडणुका लागल्या, तर तिथेही ते येऊ शकतात. तुम्हाला झोंबायचे कारण काय?”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

“अमित शाहा हे मुंबई दौऱ्यावर असताना त्यांना जमिन दाखवा असे म्हणले होते. पण अमित शाहांचा बोलण्याचा अर्थ यांना कळला नाही. त्यांना जमिनीवर या असे म्हणायचे होते. आता म्हणताहेत आसमान दाखवू. कोणाच्या जीवावर आसमान दाखवू बोलत आहात उद्धव ठाकरे. शिवसेनेचा जन्म झाला 19 जून 1966 तेव्हा तुम्ही 6 वर्षांचे होता. तेव्हा तुम्ही कुठेच नव्हता. तुम्ही 39 व्या वयात जेव्हा मी मुख्यमंत्री होतो. तेव्हा तुम्ही राजकारणात आलात. त्याच्याआधी तुम्ही शिवसेनेत सक्रिय नव्हते. बरीच आंदोलने झाली तेव्हा तुम्ही कुठे होता. आतापर्यंत कोणाच्या कानशिलात लगावली”, असे नारायण राणे यांनी म्हटले.

- Advertisement -

“उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री झाले, तेव्हा मी म्हणालो होतो, की हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. शिवसेनेच्या संघर्षाच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कुठेच नाहीत”, असेही नारायण राणे यांनी म्हटले.

“खोक्याचे काय बोलता आहात, तुम्हीच खोके खाल्ले सगळे सांगत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह यशवंत जाधाव यांनी सांगितले, तुम्ही खोके कसे खाल्ले. कुणी, कुणे कसे खोके दिले हे संगळं सांगत आहेत”, असे नारायण राणे यांनी म्हटले.

“तुमची औकात आहे का?, तुम्ही काय केलंत, तीन दिवस केवळ मंत्रालयात बसले. जेलमध्ये असणाऱ्या संजय राऊतांची खुर्ची सभेला खाली ठेवली. हिंदुत्वासाठी कोणता त्याग केला. हिंदुत्वाच्या नावावर यांनी घर चालवलं. छत्रपती शिवजी महारांच्या नावावर शिवसेना चालवली. एकतरी काम छत्रपती शिवाजी महाराज्यांसाठी केले का?”, असे प्रश्न उपस्थित करत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे आणि मातोश्रीवर हल्लाबोल केला.

“यांच्या एवढा खोटारडा माणूस मी पाहिला नाही, सतत खोटं बोलत राहतात, युती असताना अमित शाहांना फोन करत होते. उद्धव ठाकरे हे जगातले ढ माणूस आहेत. उद्धव ठाकरे खोटारडे आहेत, लबाड लांडगा आहेत, खोटारडे माणूस आहे”, अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले.


हेही वाचा – आम्ही ‘धन’से कमी, पण ‘मनसे’ लई आहोत; मनसेच्या राजू पाटलांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -