घरमहाराष्ट्रदसऱ्याला शिवाजी पार्कमध्ये तमाशाकारांचा मेळावा; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

दसऱ्याला शिवाजी पार्कमध्ये तमाशाकारांचा मेळावा; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Subscribe

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्यावर आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे. शिवाजी पार्कमधील मेळावा तमाशाकारांचा मेळावा होता, अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला आहे. नारायण राणे यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी बोलताना नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी केलेलं एकतरी काम सांगा? 5 तारखेच्या मेळाव्यात सांगितले पाहिजे होत मी हे हे केलं, हा उजेड पाडला मी.. एकतरी सांगण्यासाठी सारखं आहे का, एकही नाही. सामनात सभेचा फोटो पाहिला विरळ विरळ लोकं बसवली होती. उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु होताच लोक उजव्या बाजून बाहेर निघायला लागली. बाळासाहेब भाषणासाठी उभे राहत होते तेव्हा भाषण संपेपर्यंत एक माणूस जागेवरून हलत नव्हता. काय गुणवत्ता पात्रता तुमची… काहीही विचारलं तरी मला माहित नाही मला येत नाही. याशिवाय काही उत्तरं दिली नाही, मग झालात कशाला मुख्यमंत्री? यावेळचा शिवाजी पार्कमधील मेळावा तमाशाकरांचा मेळावा होता, काय वक्ते दिले वा… अशा शब्दात राणेंनी उद्धव ठाकरेंवर जहरी टीका केली आहे.

- Advertisement -

वाकायला पण डॉक्टर लागतो मग काम काय करणार? अपघाताने मुख्यमंत्री झालात आणि अडीच वर्षाच अडीच तास मंत्रालयात आलात.. तुम्ही हिंदुत्वाबद्दल तोंड उघडू नये, बेगडी हिंदुत्व आहे, शिवसेना वाढवण्यात योगदान काय? कोणावर हात उचलला नाही, साहेबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही अशा शब्दात नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.
——————


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -