घरताज्या घडामोडीनिवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर.., नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर.., नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य

Subscribe

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळासोबतच केंद्रीय निवडणूक समितीतून वगळण्यात आलं आहे. त्यामुळे नितीन गडकरी हे राजकारणातून निवृत्त होणार असल्याची चर्चा सुरू होती. पुढील निवडणुकीसाठी गडकरींनी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. निवडणुकीत मत द्यायचे आहे तर द्या नाहीतर नका देऊ असे म्हटले तरीसुद्धा लोकं मत देतील, असं मोठं विधान नितीन गडकरी यांनी केलं आहे.

मुंबईतील अंधेरी येथील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गर्व्हमेंट’च्या दीक्षांत कार्यक्रमात नितीन गडकरी बोलत होते. गडकरी भाषणात म्हणाले की, पुढच्या निवडणुकीत मी कटआउट लावणार नाही. मी कार्यकर्त्यांना चहापाणी देणार नाही आणि पोस्टरही लावणार नाही. लोकांना चांगलं काम करणारा पाहिजे असतो. मी आयुष्यात कोणाच्या गळ्यात हार घातला नाही. माझ्या स्वागताला एकही माणूस येत नाही. त्यामुळे निवडणुकीत मत द्यायचे असेल तर द्या नाहीतर नका देऊ असे म्हटले तरीसुद्धा लोकं मतं देतील, असं नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisement -

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आणि सी लिंकचे पैसे वसूल झाले असल्याचे सांगत लोकांना तुम्ही चांगली सेवा दिल्यास ते पैसे काढण्यास तयार होतील. आतापर्यंत 45 लाख कोटींची कामे केली आहेत. कामांसाठी निविदेसाठी आम्ही ई-टेंडरिंग प्रक्रिया राबवत आहोत. तंत्रज्ञान किती महत्त्वाचे आहे हे आम्ही पाहत असल्याचे नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले नितीन गडकरी हे २०२४च्या लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाचा प्रमुख चेहरा असल्याचे आतापर्यंत मानले जात होते. गडकरींचे नेतृत्व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून तयार झालेले असल्याने संघ विचारांचा दांडगा प्रभाव त्यांच्या राजकारणावर पदोपदी जाणवतो.

- Advertisement -

रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून करत असलेल्या प्रभावी कामामुळे ते विरोधकांमध्येही लोकप्रिय नेते आहेत. याच प्रकारे तीन वेळेस मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे शिवराजसिंह चौहान २०२४च्या लोकसभा निवडणुकीत प्रतिस्पर्धी होऊ नयेत म्हणून तर या दोघांनाही बाजूला करण्यात आले नाही ना, असे प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.


हेही वाचा  : भाजपच्या केंद्रीय संसदीय मंडळातून नितीन गडकरींना


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -