घरताज्या घडामोडीशिंदेंची गाडी बुलेट ट्रेनच्याही पुढे धावणार, गडकरींकडून मुख्यमंत्र्यांवर मिश्कील टीका

शिंदेंची गाडी बुलेट ट्रेनच्याही पुढे धावणार, गडकरींकडून मुख्यमंत्र्यांवर मिश्कील टीका

Subscribe

आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना असं अमृत पाजलं आहे की त्यांची गाडी आता सुसाट जाईल. एकनाथ शिंदेंची गाडी बुलेट ट्रेनच्याही पुढे धावणार, अशी मिश्कील टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडून ७५व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त केंद्रानं सुरु केलेल्या आजादी का अमृत महोत्सव या कार्यक्रमातील ‘संकल्प से सिद्धी’ परिषद मुंबईतल्या ताज पॅलेसमध्ये पार पडली. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. या परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी आणि कन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

आपल्याला गुंतवणूक आणखी वाढवावी लागणार आहे. सीआयआयने एग्रीकल्चरल ग्रोथ रेटवर लक्ष द्यावं आणि जंगल पर्यटनावर लक्ष द्यावं. त्यामुळे आदिवासी ग्रोथ रेट बनवण्यात मदत होईल आणि जे प्रोजेक्ट अर्धवट आहेत ते पूर्ण करावे. आत्मनिर्भर बनवण्याचा मोदींचा विचार आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

इनोव्हेशनमध्ये आपण आघाडीवर आहोत, आपण देशाला मार्गदर्शन करु शकतो. मागील आठ वर्षांमध्ये मोठे परिवर्तन झाले आहे. आठ वर्षाआधी काय झालं होते, ते आता मी बोलणार नाही. आपण देशाला आर्थिक घटकांवर आघाडीवर नेऊ शकतो. महाराष्ट्र सगळ्याच बाबतील अग्रेसर आहे. सेवा, कृषी, GDP मध्ये आपलं राज्य पुढे आहे. MSRDC ने अनेक रस्ते बनवले आहेत, असे देखील नितीन गडकरी म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा : कोणत्याच पक्षांशी युती करणार नाही, स्वबळावर निवडणुका लढणार; राजू शेट्टींचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -