Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना

मुंबई-गोवा महामार्गाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या राज्य सरकारला महत्त्वाच्या सूचना

Subscribe

मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मोठे जिकरीचे आहे असेच म्हणावे लागेल. पण आता या मार्गाचा कायापालट करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आहेत.

राज्यात मुंबई-पुणे, मुंबई-नाशिक इतकेच काय तर समृद्धी महामार्गासारखे रस्ते तयार करण्यात आले आहे. पण मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न अद्यापही प्रलंबित आहे. या मार्गावरून प्रवास करणे म्हणजे मोठे जिकरीचे आहे असेच म्हणावे लागेल. पण आता या मार्गाचा कायापालट करण्याच्या सूचना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिलेल्या आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले आहे. कायमच या मार्गावरील कामाला कोणत्या ना कोणत्य कारणामुळे अडथळा येतो आणि हे काम अपूर्ण राहते. त्यामुळे या मार्गावरील कामाला गती देऊन गणपतीपर्यंत कमीत कमी या महामार्गाच्या एकेरी मार्गाचे काँक्रीटीकरण पूर्ण करण्यात यावे, अशी सूचना नितीन गडकरी यांनी राज्य सरकारला दिलेल्या आहेत. (Union Minister Nitin Gadkari important instructions to state government regarding the Mumbai-Goa highway)

हेही वाचा – एक रुपयात पीक विम्याची सरकारकडून घोषणा, पण अंमलबजावणी कधी?

- Advertisement -

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात आणि मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध रस्ते प्रकल्प आणि नवीन रस्ते प्रकल्पांच्या संदर्भात आढावा बैठक पार पडली. त्यावेळी राज्यातील रस्ते आणि महामार्गाचे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे आदेश उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिले. तर मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करताना होणारा त्रास टाळण्यासाठी या मार्गाचे कमीतकमी काँक्रीटीकरण करण्यात यावे, असे आदेश त्यांनी राज्य सरकारसहित बैठकीला उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिले.

राज्यात राष्ट्रीय महामार्ग, उड्डाणपुल आणि रस्त्यांच्या कामांमध्ये येणारे अडथळे दूर करून प्रकल्प वेळेत पूर्ण करा. कारण वेळ वाढला तर प्रकल्पाचा खर्च वाढतो, असे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत सांगितले. त्याशिवाय जमीन संपादन होत नसल्याकारणाने आणि वन विभागाची मान्यता प्राप्त करण्यासाठी विलंब होत असल्याने प्रकल्पांना सुद्धा वेळ लागच आहे. तसेच यामुळे प्रकल्प रखडले जात आहेत, त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या प्रकल्पांना गती देऊन ते प्रकल्प पूर्ण करणे, गरजेचे असल्याचे यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

प्रत्येक जिल्ह्यात सुरू करण्यात येणार स्क्रॅपिंग युनिट
15 वर्षांपूर्वीची असलेली वाहने मोडीत काढण्यात यावीत, असे धोरण केंद्र शासनाकडून कधीचेच जाहीर करण्यात आले आहे. यासाठी आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नितीन गडकरी यांच्याकडून देण्यात आलेली आहे. जूनी वाहने मोडीत काढता यावी, यासाठी प्रत्येक जिल्ह्यात स्क्रॅपिंग युनिट सुरु करण्यात याव्यात, अशा सूचना गडकरी यांनी राज्य सरकारला दिल्या आहेत. मोठ्या आणि विकसित जिल्ह्यांमध्ये 4 आणि लहान अविकसित जिल्ह्यांत 2 अशा कमीत कमी 150 ते 200 युनिट सुरु करण्यात याव्यात, अशा सूचना गडकरी यांनी दिल्या. यामुळे किमान 10 ते 15 हजार जणांना रोजगार मिळू शकेल, असेही त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

राज ठाकरेंनी उपस्थित केला होता प्रश्न
रविवारी (ता. 07 मे) राज ठाकरे यांनी रत्नागिरीतील त्यांच्या सभेमध्ये मुंबई-गोवा महामार्गाबाबत प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत त्यांनी नितीन गडकरी यांना देखील फोन केल्याचे सांगितले. त्यानंतर तत्काळ नितीन गडकरी यांनी याबाबतची दखल घेतली असल्याचे पाहायला मिळाले आहे.

- Advertisment -