‘मुख्यमंत्र्यांच्या सल्लाचा सन्मान करतो, पण सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य’

'मुख्यमंत्र्यांच्या सल्लाचा सन्मान करतो, पण सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य' ठरेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे.

If you send a photo of a car parked in the wrong place, you will get Rs 500, said Nitin Gadkari

‘परराज्यातील जे कामगार महाराष्ट्रात अडकले आहे. त्या लोकांना त्यांच्या मूळ गावी जायचे आहे. त्यामुळे या कामगार आणि मजुरांना त्यांच्या मूळगावी पाठवण्याची स्पेशल ट्रेनची व्यवस्था करता येईल का? याचा केंद्र शासनाने विचार करावा. त्याचप्रमाणे येत्या एप्रिल अखेपर्यंत यासंदर्भातील गाईडलाईन जाहीर करावी’, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. या मागणीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, ‘मुख्यमंत्र्यांच्या सल्लाचा आम्ही सन्मान करतो. मात्र, सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य ठरेल’, अशी प्रतिक्रिया गडकरी यांनी दिली आहे.

सध्याच्या परिस्थितीत मुंबईतून या परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी ट्रेन सोडली, तर कोरोनाचा संसर्ग होऊ नये, याकरता शिस्त पाळली जाईल का? याची तुम्ही गॅरंटी घ्याल का? त्यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून प्रवासी प्रवास करतील का? असा प्रश्न गडकरी यांनी उपस्थित केला आहे.

काही दिवसांपूर्वी वांद्रे स्टेशन बाहेर काय झाले हे सर्वांनी पाहिलेच आहे. ट्रेन सोडणार असे सांगितल्यानंतर हजारोंच्या संख्येने नागरिक त्याठिकाणी दाखल झाले होते. तसेच दिल्लीच्या निजामुद्दीन कार्यक्रमातून कोरोनाचा प्रसार झाला, तसे काही घडले तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे अशी स्पेशल ट्रेन सोडणे सध्यातरी अशक्य आहे. सध्याच्या स्थितीत असे करणे गंभीर आहे. त्यामुळे असा काही निर्णय घेणे अयोग्य ठरेल. पुढच्या काळात नक्की खबरदारी घेऊन याबाबत निर्णय घेतला जाईल, असे नितीन गडकरी यांनी सांगितले आहे.


हेही वाचा – सोलापुरात आढळले नवे ३ पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोनाबाधितांची संख्या ३० वर