घरदेश-विदेशमालपाणी दिल्याशिवाय फाइलच हलत नाही, गडकरींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ठेवले करेक्ट बोट

मालपाणी दिल्याशिवाय फाइलच हलत नाही, गडकरींनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर ठेवले करेक्ट बोट

Subscribe

महाराष्ट्र सरकारच्यावतीने मुंबईत विश्व मराठी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी हजेरी लावली होती. यावेळी गडकरींना मराठी भाषा, मराठी माणूस आणि उद्योग आणि त्यांच्याखात्यासंबंधीत अनेक विषयांवर आपलं परखड मत मांडल. यावेळी गडकरींनी नेहमीप्रमाणे प्रशासनातील बाबूशाही आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर करेक्ट बोट ठेवलं. महाराष्ट्रात उद्योग वाढवायचे असतील तर कामात पारदर्शकता हवी, पण आपल्याकडे मालपाणी दिल्याशिवाय अधिकारी फाइलच हलवत नाही, असं परखड विधान गडकरींनी केलं आहे. गडकरींच्या या विधानावर अनेकांनी टाळ्या वाजवून दाद दिली. विशेष म्हणजे गडकरींच्या या भाषणावेळी मंचावर उद्योग मंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरही उपस्थित होते.

ज्यांना एक तारखेला पगार मिळतो, त्यांना वेळेचं महत्व कळत नाही. व्यवस्थेमध्ये परवाने मिळायला खूप वेळ लागतो. इतक्या दिवसांत परवानग्या मिळाल्याच पाहिजेत, नाहीतर प्रोजेक्ट मंजूर करण्यात आला पाहिजे, व्यवस्थेतला प्रत्येक माणून त्रात देतो. त्याला कंटाळून लोकं निघून जातात. मंत्री असल्यामुळे लोकं आपल्यासमोर बोलत नाहीत. पण मालपाणी दिल्याशिवाय कुणी फाइलचं हलवंत नाही, अस वक्तव्य गडकरींनी केले. यावेळी सभागृहात कार्यक्रमातील उपस्थित लोकांनी हसून त्यांच्या विधानाला दाद दिली. यावर गडकरींनी मंत्र्यांकडे पाहून महाराष्ट्राबद्दल नाही बोलत तर बाहेरच्या राज्यांसाठी बोलतोय, म्हणत आपल्या विधानावर सारवासारव केली.

- Advertisement -

गडकरी पुढे म्हणाले की, वेळेला खूप महत्त्व आहे. टाईम इज कॅपिटल. मला आतापर्यंत चार डिलीट पदव्या मिळाल्या आहेत. पण ज्यावेळी मी महाविद्यालयीन शिक्षण घेत होतो, त्यावेळी अकरावी सायन्समध्ये कमी गुण मिळाल्याने मला इंजिनिअरिंगला प्रवेश मिळत नव्हता. मात्र आता बांधकाम क्षेत्रातील कामांमुळे अनेक पुरस्कार मिळत आहेत. मला याचं आश्चर्य वाटतं की, इंजिनिअरिंग केले नाही आणि आता पुरस्कार कसा घेऊ? विद्वान असणं आणि हुशार असणं यातला हा फरक आहे, असही गडकरी म्हणाले.

भ्रष्ट्राचार आणि वेळेत काम करण्याबाबत बोलताना गडकरींनी बाळासाहेबांच्या एका वाक्याची आठवण सांगितली. गडकरी म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांनी मला अॅट्रेलिकच्या शीटवर एक वाक्य लिहून दिले होते. I like People Who can get the things done. कोणत्याही परिस्थितीत काम झालं पाहिजे. करायचे असेल तर हो म्हण. करतो, बघते हे चालणार नाही.


‘त्या’ वक्तव्याप्रकरणी अजित पवारांनी अखेर व्यक्त केली दिलगिरी, म्हणाले…

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -