रेल्वेत मुंबईच्या ४४८ उमेदवारांच्या नोकरीचा मार्ग मोकळा, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंचा पाठपुरावा

Raosaheb Danve

११ जून २०२२ रोजी रेल्वे मध्ये CEN 01/2018 असिस्टंट लोको पायलट भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती, त्यात मुंबई RRB च्या पात्र वेटलिस्टवरील उमेदवारांना डावलून गोरखपूरच्या RRB च्या उमेदवारांना RRB मुंबईच्या अधिकार क्षेत्रात संधी देण्यात आली, यामुळे महाराष्ट्रातील विशेषतः मुंबईतील वेटलिस्टवर असलेल्या उमेदवारांची संधी हुकली होती. ही बाब केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ रेल्वे बोर्डाच्या संबंधित अधिकाऱ्यांना सुचना दिल्या त्यामुळे मुंबईतील रिक्त जागांची गरज मागवून मुंबईच्या वेटलिस्ट उमेदवारांना संधी दिली जाणार आहे. याविषयी नोटीफिकेशन काढले असून त्यामुळे मुंबईच्या उमेदवारांना संधी दिली जाणार आहे तसेच भारतातील RRB चे एकूण 7400 उमेदवारांचे काम मार्गी लागणार आहे.

रेल्वे बोर्डा कडून RRB मार्फत गरजेनुसार लोको पायलट ची परिक्षा घेतली जाते. त्यानुसार मेन पॕनल व वेटींग लिस्ट ची नावे जाहिर करण्यात येतात.केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांनी महाराष्ट्रातील या उमेदवारांवर होणारा अन्याय होऊ दिला नाही. RRB मुख्य अधिकाऱ्यां सोबत चर्चा करुन व या विषयाचा सतत पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावला.

रेल्वे राज्यमंत्री श्री दानवे साहेबांच्या कार्यतत्परतेमुळे मुंबई च्या 448 उमेदवारांसहीत भारतातील RRB चे एकूण 7400 एएलपी वेटींग उमेदवारांचे नोकरीचे काम मार्गी लागत आहे. गेली अडीच वर्षे रखडलेले काम रेल्वे राज्यमंत्री श्री दानवे साहेबांच्या सतर्कतेमुळे सफल झाले आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.


हेही वाचा : कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला येऊ नका, वाढदिवसानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन