घरताज्या घडामोडी'मलिकांनी वानखेडेंचं चारित्र्यहनन करण्याचं काम थांबाववं; त्यांच्या केसाला ही धक्का लागला तर...

‘मलिकांनी वानखेडेंचं चारित्र्यहनन करण्याचं काम थांबाववं; त्यांच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा’

Subscribe

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनाच्या तपासानंतर बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन समोर आलं. यानंतर अनेक बॉलिवूड कलाकार एनसीबीच्या रडारवर आले. या कारवाई दरम्यान एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचं नाव चर्चेत आलं. गेल्या वर्षभरापासून समीर वानखेडे यांनी ड्रग्ज प्रकरणात कारवाया करून अनेकांच्या चौकशा केल्या आहेत. दरम्यान आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली चौकशी सुरू आहे. आज आर्यन खान प्रकरणातील पंच असलेल्या प्रभाकर साईलने समीर वानखेडेंवर खंडणी घेतल्याचा गंभीर आरोप लावला आहे. तसेच यापूर्वी राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील वानखेडेंवर आरोप केले होते. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप खोडसळ आणि चुकीचे आहेत. त्यामुळे त्यांनी वानखेडेंचं चाहिरत्र्यहनन करण्याचं काम थांबावावं, त्यांच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा,’ असा इशारा आठवलेंनी दिला आहे.

नक्की काय म्हणाले आठवले?

समीर वानखेडे यांच्यावर नवाब मलिक यांनी केलेले आरोप अत्यंत चुकीचे आणि पूर्वग्रह दूषित खोडसाळ आहेत. नवाब मलिक आमचे मित्र आहेत, पण तरीही त्यांनी समीर वानखेडे यांच्या बाबतीत घेतलेली भूमिका ही चुकीची आहे. समीर वानखेडे यांचं चारित्र्यहीन करण्याचं काम नवाब मलिक यांनी थांबाववं आणि त्यांना जातीय व धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नये. समीर वानखेडे यांच्या जीवितास धोका होऊ नये. त्यांना राज्य सरकारने संरक्षण द्यावे. समीर वानखेडे या कर्तबगार अधिकाऱ्याच्या केसाला ही धक्का लागला तर याद राखा असा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज दिला.

- Advertisement -

तसेच आर्यन खान याच्या विरुद्ध सबळ पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे न्यायालयात त्याला अद्याप जामीन मिळालेला नाही. कारवाई करताना पुरावे नसते तर न्यायालयाने तात्काळ आर्यनला जामीन दिला असता. याबाबत समीर वानखेडे यांनी केलेली कारवाई योग्य आहे. समीर वानखेडे यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. ड्रग्जच्या विळख्यातून युवा पिढीला वाचविण्याचे काम नार्कोटेस्ट विभाग करीत आहेत. तेच काम समीर वानखेडे करीत आहे. युवा पिढीला ड्रग्जच्या विळख्यातून वाचविण्याचे काम देशहिताचे असून असे चांगले काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना त्रास देणे योग्य नसून उलट आशा अधिकाऱ्यांच्या समर्थनासाठी पुढे आले पाहिजे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या केसाला ही धक्का लागला तर रिपब्लिकन पक्ष रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असाही इशारा आठवलेंनी दिला.

समीर वानखेडे आय आर एस नार्कोटेस्ट कंट्रोल ब्युरो या सेलचे प्रमुख अधिकारी आहेत. आतापर्यंत त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक झाले आहे. परंतु मंत्री नवाब मलिक यांच्या जावयावर समीर वानखेडे यांनी कारवाई केली असल्यामुळे त्यांचा राग मनात धरून समीर वानखेडे यांना नामोहरम करण्याचा प्रयत्न महाविकास आघाडी आणि नवाब मलिक यांनी केलेला आहे. त्यासाठी सत्तेचा गैरवापर नवाब मलिक आणि महाविकास आघाडी करत असल्याचा आरोप रामदास आठवल्यांनी केला.

- Advertisement -

पुढे ते म्हणाले की, अशा प्रकाराचा एखादा गंभीर निर्णय घेणे हा त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांसोबत घेतलेली सामूहिक प्रक्रिया आहे. त्या निर्णयासाठी फक्त समीर वानखेडे या मागासवर्गीय अधिकाऱ्याला जबाबदार धरणे चुकीचे आहे. नवाब मलिक यांच्या जावयावर झालेली कारवाई समीर वानखेडे यांच्या कर्तव्याचा भाग होता. नवाब मलिक यांच्या भूमिकेमुळे तणाव वाढत आहे आणि जाणीवपूर्वक नवाब मलिक या प्रश्नाला धार्मिक रंग देत आहेत. समीर वानखेडे हे मागासवर्गीय अधिकारी असून यांच्यावर अशा प्रकारचे आघात होणार असतील, तर आम्ही समीर वानखेडे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू.


हेही वाचा – Cruise Drugs Case: प्रभाकर साईलच्या खंडणी आरोपात काही तथ्य नाही – NCB


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -